शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बसथांब्यांची दुरवस्था

By admin | Updated: August 11, 2016 02:49 IST

पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर या ठिकाणी बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे

नेहरुनगर : पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर या ठिकाणी बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पिंपरी-चिंचवड़ महानगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्चून शहरात जागोजागी अत्याधुनिक स्टीलचे बसस्टॉप बसविले असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. परंतु, अद्यापही अनेक मार्गावर बसस्टॉप बसविले नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर बसथांब्यावरून अनेक नागरिक, कामगार, महिला, मुली, विद्यार्थी येथून कासारवाड़ी, दापोडी, खड़की, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आदी ठिकाणी कामासाठी इतर महत्त्वाच्या कामासाठी जाण्यासाठी या ठिकाणी दररोज थांबत असतात. यामुळे या बसथांब्यावर प्रवाशांची दिवसभर मोठी गर्दी असते.परंतु, या ठिकाणी फक्त बसथांबा फलक आहे. मात्र, बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच पावसात - उन्हात ताटकळत बसची वाट बघत उभे राहावे लागते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे प्रवाशांना पावसातच भिजत उभे राहावे लागत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषत: महिला व मुलींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. हा बसथांबा वल्लभनगर येथील पुणे-मुंबई या मुख्य मार्ग असून, या मार्गावरून दररोज पीएमपीएलच्या शेकडो बसेस या ठिकाणावरून जात असतानादेखील अद्यापही या मार्गावर बसस्टॉप का बसविण्यात आला नाही, असा प्रश्न नागरिक प्रवाशी विचारत आहेत. तातडीने या ठिकाणी पालिका प्रशासनाने बसस्टॉप उभारून प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर या ठिकाणी बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)फुकटच्या जाहिरातीने विद्रुपीकरणपिंपरी-चिंचवड़ शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या वतीने जागोजागी अत्याधुुनिक स्टीलचे बसस्टॉप बसविण्यात आले असून, या बसस्टॉप कुठली बस कुठे जाते, याचा फलक लावला आहे. परंतु, अनेक ठिकाणी असलेल्या बसस्टॉप कुठली बस किती वाजता जाणार आहे, कुठली बस किती वाजता येणार आहे, याचे वेळापत्रक लावले नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्टॉपवर वेळापत्रक लावून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिकेने जागोजागी लाखो रुपये खर्च करून आधुनिक स्टीलचे आधुनिक बसस्टॉप बसविले आहेत. परंतु या बसस्टॉपचा अनेक जण फुकटची जाहिरातबाजी करण्यासाठी उपयोग करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक बसस्टॉपवर पोस्टर फ्लेक्स पॉमपेस्ट्स माहितीपत्रके लावून अनेक उद्योग व्यावसायिक वाढीसाठी या बसस्टॉपचा आधार घेतला असून, फुकटची जाहिरातबाजी करीत आहेत. यामुळे अत्याधुनिक बसस्टॉपचे विद्रूपीकरण होत असून, स्वच्छ सुंदर शहर अशी ओळख निर्माण झालेल्या शहराला या जाहिरातीमुळे विद्रूपीकरणाचे गालबोट लागत आहे.