शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर मिळणार बसची माहिती

By admin | Updated: May 27, 2017 01:19 IST

प्रवाशांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या गरजा व मागणीनुसार सक्षम बससेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाणार असून

पुणे : प्रवाशांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या गरजा व मागणीनुसार सक्षम बससेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाणार असून, लवकरच बससेवेशी निगडित सर्व बाबींचा समावेश असलेले ‘अ‍ॅप’ प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. बसथांबे, सध्याची बसची स्थिती, वेळापत्रक अशी माहिती एका क्लिकवर या अ‍ॅपद्वारे मिळणार असल्याची माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.मुंढे यांनी शुक्रवारी लोकमत कार्यालयात येऊन मनमोकळा संवाद साधला. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले. मुलाखतीदरम्यान मुंढे यांनी ‘पीएमपी’ची स्थिती सुधारण्यासाठी आखलेल्या ध्येय-धोरणांविषयी माहिती दिली. बससेवा प्रवाशांना अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सध्या बसथांबे, बसेसचे वेळापत्रक, बसमार्ग याची माहितीच प्रवाशांना मिळत नाही. बस वेळेत येईल की नाही, हे सांगु शकत नाही. त्यामुळे पीएमपीकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे. त्यात बदल करण्यासाठी बससेवेविषयी त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे मुंढे यांनी सांगितले.1 कोठेही उभे राहून ‘अ‍ॅप’मध्ये एका क्लिकवर परिसरातील सर्व बसथांबे दिसतील. तिथून जाणाऱ्या बस, त्यांचा मार्ग, तसेच सध्या संबंधित बस कोठे आहे, ही माहिती एका क्लिकवर मिळेल. बससेवेविषयीच्या तक्रारीही या अ‍ॅपमधून करता येतील.2या सुविधेमुळे प्रवाशांमध्ये सेवेविषयी विश्वास निर्माण होण्यास मदत होईल. तसेच संकेतस्थळही चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे अ‍ॅप प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.