शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळीत कांडाचे लोण आता मध्यवस्तीत

By admin | Updated: April 23, 2016 01:08 IST

वाहनांची जाळपोळ करुन आनंद लुटण्याची नवी मानसिक विकृती जन्माला येत असून उपनगरांमधील जाळपोळीचे हे लोण आता शहराच्या मध्यवस्तीत आले आहे.

पुणे : वाहनांची जाळपोळ करुन आनंद लुटण्याची नवी मानसिक विकृती जन्माला येत असून उपनगरांमधील जाळपोळीचे हे लोण आता शहराच्या मध्यवस्तीत आले आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघाजणांनी शुक्रवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास वाहने पेटवून दिल्याची घटना शुक्रवार पेठेमध्ये घडली. या घटनेत एकूण सहा वाहने जळून खाक झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.आरिफ बागवान (वय 49, रा. 743, नेहरु चौकाजवळ, शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान यांची दुचाकी त्यांनी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घरासमोर लॉक करुन लावलेली होती. त्यांनी दुचाकीवर कव्हरही घालून ठेवलेले होते. रात्री जेवण करुन सर्वजण झोपी गेले. शुक्रवारी पहाटे साधारणपणे साडेतीनच्या सुमारास मोटारसायकलवरुन दोघेजण आले. त्यांनी गाडीचे कव्हर पेटवून दिले. हे कव्हर पेटल्यामुळे दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीने पेट घेतला. काही क्षणातच ही दुचाकी जळून खाक झाली. शेजारी उभ्या असलेल्या आणखी तीन दुचाकींनाही आग लागली. त्यानंतर पुढे गेलेल्या आरोपींनी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दुचाकी जाळली. त्यानंतर हे दोघेही पळून गेले. वाहनांना आगी लावण्याआधी आरोपींनी अनेक ठिकाणी वाहने जाळण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनांवर कव्हर घातलेले आहे; तीच वाहने पेटवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. शुक्रवार पेठेमध्येही आधी गाडीचे कव्हर आरोपींनी पेटवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी शुक्रवार पेठ आणि आसपासच्या भागातील सहा ठिकाणांवरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यावरुन आरोपींचा तपास सुरु करण्यात आला आहे. खब-यांकडून माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले असून फुटेजमध्ये दिसणा-या आरोपींच्या हावभावाप्रमाणे असलेल्या तरुणांकडे चौकशी सुरु करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)> अ‍ॅडव्हेंचर म्हणून जाळपोळीचा प्रकार1नागरिकांनीही शक्यतो रस्त्यावर वाहने लावणे टाळले पाहिजे. सोसायट्यांचे पार्किंग ‘फुल्ल’ झाल्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर वाहने लावावी लागतात. मात्र, अशा प्रकारे बेवारस अवस्थेत रस्त्यावर वाहने उभी करणे धोकादायक आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना क्षणिक रागामधून घडलेल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, काही तरुण ‘अ‍ॅडव्हेंचर’ म्हणून अशी कृत्य करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. कोथरुड, कात्रज भागात वाहनांना लावण्यात आलेल्या आगींच्या घटनांचा या घटनेशी संबंध आहे का याचीही चाचपणी पोलीस करीत आहेत.2वाहने जाळण्याची एक मानसिक विकृती जन्माला येत आहे. सर्वसामान्यांचे नुकसान करुन दहशत निर्माण करण्याची पद्धत पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. गेल्या काही दिवसात संघटीत गुन्हेगारी, टोळी युद्ध यापेक्षाही जाळपोळीच्या घटनांनी अधिक दहशत निर्माण केल्याचे दिसते आहे. या घटनांना पायाबंद घालणे आवश्यक असून पोलिसांच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.> वाघोलीतील आगीत ६ ट्रक खाकवाघोली : पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये ६ ट्रक जळून खाक झाल्याची घटना उबाळेनगर येथील बाबुभाई गॅरेजमध्ये घडली. या आगीमध्ये ट्रकची बॉडी बांधण्यासाठी लागणारे साहित्य देखील जळून खाक झाले असून अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने शेजारी उभ्या असलेल्या ९ ट्रक जळण्यापासून वाचविण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही़या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नगर महमार्गालगत वाघोली येथील उबाळेनगर परिसरामधे बाबुभाई मिस्त्री यांचे ट्रकची बॉडी बांधणे आणि रिपेयरिंगचे गॅरेज आहे. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास गॅरेजमध्ये झोपलेल्या प्रशांत जायभाये याला भिंतीच्या कडेने असणाऱ्या पत्र्याच्या शेडला मोठी आग लागली असल्याचे दिसले. त्याने तत्काळ शेजारी आणि मालकाला आगीबाबत कळविले. आगीचे लोट मोठे असल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलविले. अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यागोदार पत्र्याच्या शेडसमोर असणारे ६ ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते. आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी बॉडीचे काम करण्याकरिता आलेले ६ ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले होते. यातील एक ट्रक बॉडी बांधून तयार झाला होता तर पाच ट्रकचे काम सुरु होते. ट्रक बरोबरच पत्र्याच्या शेडमध्ये असलेले साहित्य व मशीनरी देखील आगीच्या झपाट्यात खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने याच ठिकाणी उभे असलेले ९ ट्रक सुरक्षित राहिले.