शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा जाळल्याने प्रदूषणात वाढ

By admin | Updated: November 17, 2016 02:16 IST

येथील सेवारस्त्याच्या कडेला बिनबोभाट कचरा जाळला जात असल्यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चाकण : येथील सेवारस्त्याच्या कडेला बिनबोभाट कचरा जाळला जात असल्यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळील चाकण-मुटकेवाडी दरम्यानच्या सेवारस्त्यालगत सातत्याने होत असलेल्या या प्रकाराची तत्काळ दखल घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल कांडगे यांच्यासह येथील वाहनचालक, तसेच नागरिकांनी केली आहे.येथील नगरपरिषद हद्दीतील अनेक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, भाजीविक्रेते ओला-सुका कचरा रस्त्याच्या कडेला कशाही पद्धतीने आणून टाकतात. कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा कचरा रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी पेटविला जातो. कचरा टाकणारे बरचसे दुकानदार, हॉटेल व्यावसायिकच या कचऱ्याला आग लावतात. वाऱ्यामुळे ही आग सर्वत्र पसरून संपूर्ण कचरा जळून जातो. या आगीमुळे धुराचे लोट रस्त्यावर पसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या आगीत प्लास्टिक, काड्या, कागद यांचे प्रमाण जास्त असते. ओल्या सुक्या कचऱ्याने दुर्गंधी सुटते. हवेमुळे ही आग पसरून संपूर्ण कचरा जळला जातो. आगीच्या शेजारून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस यांची अतिज्वलनशील वाहने गेल्यास मोठा धोका उद्भवू शकतो. हिवाळ्यातील धुक्याप्रमाणे राज्य मार्गावर पसरणाऱ्या या कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय, धुराच्या प्रचंड लोटांनी समोरील बाजूने येणारे वाहनेही दिसत नसल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे.