शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडे, दुचाकी चोर गजाआड

By admin | Updated: October 12, 2016 02:34 IST

घरफोडी करण्यासाठी मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल

नारायणगाव : घरफोडी करण्यासाठी मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण सुमारे ५ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता, त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती जुन्नर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई व नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.घरफोडी व मोटारसायकलचोरी प्रकरणी टोळीतील अमित ठमा भुतांबरे (वय १९), रवींद्र बबन कडाळे (वय २२, दोघे रा. घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघांना नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. भोरवाडी येथील रामदास बाबूराव गुंजाळ यांच्या रहात्या घरासमोरून मागच्या महिन्यात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास त्यांची मोटारसायकल चोरून नेली होती. तसेच, त्याच वेळी शेजारी राहणारे भगवंत शिदे यांच्या घरातदेखील घरफोडी करून मोबाईल व रोख रक्कमेची चोरी झाली होती. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ नंबर, येडगाव, भोरवाडी, निमगाव सावा, पारगाव या भागातून चार महिन्यांपासून सुमारे ७ मोटारसायकली चोरीस गेल्याबाबत गुन्हे दाखल होते. या चोऱ्यांना आवर घालण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी संबंधित हद्दीतील पोलीस व खबऱ्यांमार्फत मोटारसायकल चोरीच्या जाणाऱ्या घटनांची माहिती घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपास करण्यास सुरुवात केली. या तपासात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची मोटारसायकल चोरून नेण्याची पद्धत, तसेच घरफोडी करण्याची पद्धत यावरून सहा. पोलीस निरीक्षक मुजावर, पोलीस नाईक दीपक साबळे, सुयोग लांडे यांनी १४ नंबर, येडगाव, भोरवाडी, निमगाव सावा, पारगाव, पिंपळवंडी या भागात आठ दिवसांपासून माहिती काढली. तसेच, आजूबाजूच्या वाड्यावस्त्यावंर, गावात बाहेरगावाहून कोण-कोण कामगार, परप्रांतीय शेतीच्या किंवा अन्य कामांसाठी आले आहेत, याची माहिती घेतली. त्यामध्ये त्यांनी रात्रीच्या वेळी हद्दीतील कॅनॉल रस्त्याने फिरणाऱ्या इसमांची चौकशीसुद्धा केली. यादरम्यान पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरटे हे संगमनेर तालुक्यातील घारगाव व संगमनेर परिसरातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संगमनेर व घारगाव परिसरात शोधमोहीम सुरू केली. पोलिसांना घारगाव येथील अमित भुतांबरे व रवी कडाळे यांच्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी कबुली दिली. या कामात त्यांचे इतर साथीदार सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता, त्यांपैकी दोन जण हे अल्पवयीन असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी चोरी केलेल्या दुचाकींमध्ये या दोन जणांकडून १० मोटारसायकली, २० हजार रोख व ९ मोबाईल, असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच, आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना ३ दिवसांची कोठडी मिळाली.