शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत ‘रो हाऊसेस’ला दणका

By admin | Updated: June 3, 2017 02:55 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) लोहगाव येथील सात अनधिकृत ‘रो हाऊसेस’ जमीनदोस्त केली. ही अनधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) लोहगाव येथील सात अनधिकृत ‘रो हाऊसेस’ जमीनदोस्त केली. ही अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी पाठवण्यात आलेल्या नोटिशीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने शुक्रवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांनी दिली. एका विकसकाकडून लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक ४५ आणि ४६ वर विनापरवाना रो हाऊसेसचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी सात रो हाऊसेसचे ९ हजार ५०० स्क्वेअर फुटांचे बांधकाम करण्यात येत होते. या बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात पीएमआरडीएकडे निनावी तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकाममालक नितीन डाळे आणि महेश खांदवे यांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत कलम ५३ (१) आणि ५४ अन्वये बांधकाम पाडण्याची नोटीस देण्यात आली होती. या नोटिशीकडे दुर्लक्ष करून त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. पीएमआरडीएची नोटीस मिळाल्यानंतरही बांधकाम सुरूच ठेवण्यात आले होते. पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्या आदेशानुसार बांधकाम विरोधी पथकाकडून सकाळी दहाच्या सुमारास कारवाई करीत ही बांधकामे पाडण्यात आली. या पथकात तहसीलदार विकास भालेराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक विलास सोंडे, सहायक पोलीस निरीक्षक  महेश तोगरवार, मुरलीधर खोपले, पोलीस उपनिरीक्षक राजपूत आदी उपस्थित होते.अ‍ॅपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन पीएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रामध्ये महापालिका, कॅन्टोन्मेंट क्षेत्र वगळून सात तालुके आणि ८५७ गावे येतात. या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत मोबाईल अ‍ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईलद्वारे बांधकामाचा फोटो अ‍ॅपवर पाठवताच डिजिटल मॅपवरून संबंधित बांधकाम अनधिकृत आहे अधिकृत, हे पाहून कारवाई केली जाणार आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचेही किरण गित्ते यांनी सांगितले.