शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बांगरवाडीतील गुप्त विठोबाला गर्दी

By admin | Updated: July 16, 2016 00:55 IST

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या बांगरवाडी येथील गुप्त विठोबा मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होती.

बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या बांगरवाडी येथील गुप्त विठोबा मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होती.सकाळी सहा वाजता मुंबई येथील ए.टी.एस.चे पोलीस निरीक्षक किसनराव गायकवाड यांच्या हस्ते देवास अभिषेक केला. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून या ठिकाणी बेल्हा, आणे, साकोरी, गुळूंचवाडी, कळस, तांबेवाडी आदी ठिकाणांवरून आलेल्या दिंड्यांचे स्वागत श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा मंडळाचे अध्यक्ष नकाजीबुवा बांगर यांनी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आशाताई बुचके, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपसभापती महादू भोर, जुन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीता वाघ, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे, जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ आदींनी भेट दिली. या ठिकाणी ग्रामस्थांनी येणाऱ्या भाविकांची सोय उत्तमरीत्या केली होती. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने बसची सोय करण्यात आली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.