शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामे पूर्णत्वाची घाई

By admin | Updated: March 21, 2016 00:30 IST

अनधिकृत बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने नागरिकांनी शहरातील अनेक बांधकामे जैसे थे अवस्थेत अर्धवट ठेवली होती.

पिंपरी : अनधिकृत बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने नागरिकांनी शहरातील अनेक बांधकामे जैसे थे अवस्थेत अर्धवट ठेवली होती. महापालिकेने अनधिकृत बांधकामे ज्या ठिकाणी सुरू आहेत, त्या ठिकाणची छायाचित्रे काढून, पंचनामे करून फौजदारी गुन्हे दाखल केले होते. कोणत्याही क्षणी कारवाई होईल, या भीतीने अनेक ठिकाणी नागरिकांनी बांधकामे अर्धवट स्थितीत ठेवली होती. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची बांधकामे नियमितीकरणाची शासनाकडून घोषणा होताच, अर्धवट अवस्थेतील बांधकामांना पुन्हा गती आली आहे. ही बांधकामे पूर्ण करण्याची घाई केली जात आहे. जनहित याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने अवैध बांधकामांवर कारवाई करावी, असे आदेश २०११ मध्ये दिले होते. १ लाख १० हजार ४४१ अवैध बांधकामे असल्याची करसंकलन विभागाकडून प्राप्त झालेली माहिती याचिकाकर्त्याने न्यायालयाला सादर केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने अवैध बांधकामे केलेल्यांना नोटीस पाठवल्या. महापालिकेला न्यायालयाने कारवाईसाठी दिलेली मुदत ३१ मार्च २०१२ला संपुष्टात आली. बांधकामे नियमितीकरणासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च २०१२नंतर अवैध बांधकामे होऊ देऊ नयेत, असा निर्णय घेण्यात आला होता. तरीही शहरात अनधिकृत बांधकामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेने कठोर निर्णय घेऊन कारवाईची मोहीम राबवली. त्यात १२ लाख चौरस फुटांची ३८८ बांधकामे भुईसपाट झाली. ३१ मार्चनंतरही सुरू असलेल्या २८४७ बांधकामांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. २०४१ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. त्या रहिवाशांनी आता अर्धवट बांधकामे पूर्ण करण्याची घाई केली असून, शहराच्या विविध भागांत पुन्हा बांधकामे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित असल्याने आज ना उद्या शास्ती माफ होईल, अशी अपेक्षा बाळगून अनेकांनी केवळ मिळकत कराची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली होती. शास्ती भरण्याची गरज उरली नाही, या आनंदात उरलेले बांधकाम पूर्ण करण्यावर अनेकांनी भर दिला आहे.