शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागांवर बिल्डरांचा ताबा

By admin | Updated: November 19, 2014 04:24 IST

शहराच्या विकास आराखड्यातील नागरी व सार्वजनिक सुविधा उभारण्याविषयीच्या अनेक जागांवर महापालिकेने आरक्षण टाकले आहे.

पुणे : शहराच्या विकास आराखड्यातील नागरी व सार्वजनिक सुविधा उभारण्याविषयीच्या अनेक जागांवर महापालिकेने आरक्षण टाकले आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांनी (बिल्डर) आर ७ नुसार संबंधित जागेच्या १५ टक्के जागा विकसित करण्याचे प्रस्ताव दिले. मात्र, अनेक प्रस्ताव धूळ खात पडले असून, संबंधित बिल्डरांनी लाखो चौरस फुटांच्या जागा अद्याप विकसित करून महापालिकेच्या ताब्यात दिल्या नसल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. शहरातील विकास आराखड्यामध्ये शाळा, मैदान, हॉस्पिटल, वाहनतळ, अग्निशामक केंद्र व व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी आरक्षण टाकले जाते. मात्र, महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीतील आर-७च्या तरतुदीनुसार आरक्षित जागेचे मालक स्वखर्चाने ही जागा विकसित करून देण्याची सवलत आहे. जागामालकाने एकूण जागेच्या १५ टक्के जागा विकसित करून देणे अपेक्षित आहे. त्यानुसार अनेक आरक्षणाच्या जागा आर-७ नुसार विकसित करण्याचे प्रस्ताव दाखल झाले. त्यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव हॉस्पिटल विकसित करून देण्याविषयीचे आहेत. त्यानुसार महापालिकेच्या ताब्यात आरक्षणाच्या १५ टक्केनुसार लाखो चौरस फूट जागा ताब्यात येणे अपेक्षित होते. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधीचे उत्पन्न व भाडे मिळाले असते. मात्र, जागा ताब्यात नसल्याने कोट्यवधीचे नुकसान होत आहे.दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम व भूमी-जिंदगी विभागात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे बिल्डर व जागामालकांच्या जागा ताब्यात घेण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आर-७ नुसार आरक्षित जागा विकसित करून देण्याविषयीच्या कराराचे संबंधितांनी उल्लंघन केले आहे. मात्र, महापालिका प्रशासन कारवाई करण्याऐवजी संबंधित बिल्डरांना पाठीशी घालत असल्याचे प्रकार अनेकदा उजेडात आले. आयसीसी टॉवर व इनामदार हॉस्पिटल ही ताजी उदाहरणे आहेत. तरीही संबंधितांवर कारवाई होण्याऐवजी कारवाई करणाऱ्यावर राजकीय दबाब आणला जातो. त्यामुळे अनेकदा मागणी करूनही आर ७ नुसार विकसित करण्यात येणाऱ्या आरक्षणाची यादी व कार्यवाहीची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्याविष़यी नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)