शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

शौचालय बांधा; अन्यथा वीज, पाणी, रेशन बंद

By admin | Updated: August 23, 2016 20:56 IST

३० सप्टेंबरपर्यंत वैयक्तिक शौचालये नसलेल्या लाभार्थ्यांवरही आता कारवाई होणार आहे. २ आॅक्टोबरनंतर त्यांचे वीज, पाणी कनेक्शन बंद करण्याबरोबर रेशनही बंद करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २३  : ३० सप्टेंबरपर्यंत वैयक्तिक शौचालये नसलेल्या लाभार्थ्यांवरही आता कारवाई होणार आहे. २ आॅक्टोबरनंतर त्यांचे वीज, पाणी कनेक्शन बंद करण्याबरोबर रेशनही बंद करण्यात येणार आहे.  शासनाने या वर्षी दहा जिल्हे हगणदरीमुक्त करण्याचे ठरवले असून यात पुणे जिल्हाही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यादृष्टीने काम सुरू केले असून गेल्या चार महिन्यांत वेगाने काम सुरू आहे. तरीही आजच्या तारखेला १ लाख ७४५ शौचालये बांधणे बाकी आहेत. जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असले तरी ३० सप्टेंबरपर्यंतच ते टार्गेट पूर्ण करण्याचे ठरविले आहे.

यापूर्वी जर कोणत्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्याकडे शौचालय नसेल तर त्यांचे पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले होते. आता १५ आॅगस्टला सर्व ग्रामपंचायतींत ग्रामसभा घेऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. ३० सप्टेंबरपर्यंतबांधकाम पूर्ण न झाल्यास २ आॅक्टोबरपासून संबंधित लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

यात त्याला ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचे दाखले मिळणार नाहीत, शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या वैैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी शिफारस करण्यात येणार आहे, या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यात येऊ नये, याबाबत तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांना कळविण्यात येणार आहे. या कुटुंबांची नावे गावात दर्शनी भागात फ्लेक्सवर लावण्यात येणार असून वर्तमानपत्रातही प्रसिद्ध केली जाणार आहेत.

रेशनकार्डवर धान्य, साखर आणि रॉकेल बंद केले जाणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आलेले पाणी नळजोड तोडण्यात येणार असून वीज तोडण्याबाबत महावितरण कंपनीस कळविण्यात येणार आहे, असे ग्रामसभेचे ठराव करून संबंधितांना तशी नोटीसही दिली जाणार आहे. ग्रामसभेची मान्यता घेतल्यानंतर वरील सर्व कारवाई केली जाणार आहे. घरभेटी आणि बँडपथकहगणदरीमुक्तीसाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत गृहभेट अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २२ हजारांहून जास्त जिल्हा परिषद कर्मचारी स्वच्छ भारत मिशनसाठी गावपातळीवर कार्य करीत आहेत. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. २ आॅक्टोबर २०१६ रोजी याच अभियानाचा भाग म्हणून एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये गृहभेट आणि स्वच्छता उपक्रम करून राज्यात महास्वच्छता दिन साजरा केला जाणार आहे. तसेच आता ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांच्या घरी २ आॅक्टोबरपासून बँड व हलगीपथक जाऊन वाजविण्यात येणार आहे. भोर, वेल्हेसाठी मुदत वाढविली१५ आॅगस्टला भोर, वेल्हा हगणदरीमुक्त करणार असल्याची घोषणा यापूर्वी प्रशासनाने केली होती. मात्र दरम्यानच्या काळात या तालुक्यात जास्त पाऊस असल्याने तेथील प्रशासनाने आणखी थोडा अवधी मागितला आहे. भोर तालुक्यात फक्त १४३, तर वेल्हे तालुक्यात २९६ शौचालये बांधणे बाकी आहे. तालुक्यानुसार शौचालय नसलेली कुटुंबेइंदापूर : २५५०७दौंड : १२७०१बारामती : १२७५६खेड : ८७६३मावळ : ८८९९शिरूर : ८८९२जुन्नर : ७७०१हवेली : ४५५४आंबेगाव : ५३७१पुरंदर : ५२३३भोर : १४३वेल्हा :२१६एकूण : १००७४५