शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खोरला शौचालय बांधा... मोहीम

By admin | Updated: November 14, 2016 02:14 IST

ग्रामपंचायतीने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण खोरगावात हगणदरी मुक्तीच्या दिशेने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार या भागामधून या मोहिमेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद

खोर : ग्रामपंचायतीने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण खोरगावात हगणदरी मुक्तीच्या दिशेने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार या भागामधून या मोहिमेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळताना दिसत आहे.शौचालय बांधा.....शौचालय वापरा.... अशी जनजागृती आता करण्यात असून, ही मोहीम सध्या अंतिम टप्प्यामधील असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषद पुणे व दौंड पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन अभियानाला ग्रामीण भागामधून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेदेखील गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी सांगितले आहे. येत्या ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत ज्या लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय नसल्यास त्या लाभार्थ्यास शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा फायदा मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. खोर येथे सरपंच सुभाष चौधरी, संपर्क अधिकारी डॉ. बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली (दि. १२) रोजी खोर गावामधून प्राथमिक शाळा व श्री भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शौचालय बांधा... शौचालय वापरा... या विषयी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम अंतिम टप्प्यामधील असून, ३० नोव्हेंबरनंतर लाभार्थ्यास शासनाच्या सर्वच प्रकारच्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे खोर ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. या मोहिमेस सरपंच सुभाष चौधरी, ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर, तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.