शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आयुक्तांचे अंदाजपत्रक १,२०० कोटींनी फुगविलेले

By admin | Updated: February 2, 2016 01:37 IST

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदा ५ हजार कोटींचा आकडा ओलांडणारे विक्रमी अंदाजपत्रक सादर केले आहे. एकाही नवीन प्रकल्पाची घोषणा अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली

पुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदा ५ हजार कोटींचा आकडा ओलांडणारे विक्रमी अंदाजपत्रक सादर केले आहे. एकाही नवीन प्रकल्पाची घोषणा अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली नसतानाही आयुक्तांनीच १,२०० कोटी रुपयांनी फुगविलेले अंदापत्रक सादर केले असल्याची जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.महापालिकेचे आगामी २०१६-१७चे अंदाजपत्रक कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केले आहे. स्थायी समितीकडून ते मुख्य सभेला सादर केले जाईल. या पार्श्वभूमीवर, आयुक्तांच्या अंदाजपत्रकातील त्रुटी उजेडात आणण्यात आल्या आहेत. महापालिकेला बांधकाम शुल्कामधून २०११पासून सरासरी ६०० कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. सध्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण असताना पुढील आर्थिक वर्षामध्ये ९३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळेल, असे अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. वस्तुत: मंदीचा विचार करून बांधकाम शुल्काचे उत्पन्न कमी धरणे आवश्यक होते. मिळकत कर उत्पन्नही ६०० कोटी रुपयांच्या दरम्यान असताना पुढील वर्षात ८५६ कोटी रुपये त्यातून मिळतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. महापालिकेला मिळणाऱ्या इतर उत्पन्नस्रोतांमधून गेल्या ५ वर्षांत २५० कोटींची वाढ झाली आहे; पण एकाच वर्षात या उत्पन्नामध्ये आणखी २५० कोटींची वाढ होईल, असा अंदाज धरण्यात आला आहे. महापालिकेचे उत्पन्न घटत असताना महसुली खर्चामध्ये मात्र मोठी वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय आयुक्तांनी सुचविणे आवश्यक असताना त्याबाबत काहीच तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. खर्चावर नियंत्रण ठेवण्याऐवजी पाणीपट्टीमध्ये वाढ करून नागरिकांवर बोजा टाकण्यात आला आहे. इतर उत्पन्नामध्ये ज्याप्रमाणे मोठी वाढ दर्शविली, त्याचप्रमाणे इतर खर्चामध्येदेखील २९० कोटींनी वाढ होईल, हे दर्शविण्यात आले आहे.