शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरटी’चा मार्ग धोकादायकच!

By admin | Updated: September 11, 2015 04:47 IST

महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जलद गती बससेवेचे (बीआरटीएस) ‘सेफ्टी आॅडिट’ न करता घाईघाईने उद्घाटन केले. त्यामुळे सांगवी-रावेत या साडेचौदा किलोमीटर

- मिलिंद कांबळे,  पिंपरीमहापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जलद गती बससेवेचे (बीआरटीएस) ‘सेफ्टी आॅडिट’ न करता घाईघाईने उद्घाटन केले. त्यामुळे सांगवी-रावेत या साडेचौदा किलोमीटर अंतराच्या मार्गावर दोनच दिवसानंतर एका पादचाऱ्याचा बळी गेला. त्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधींनी बीआरटी मार्गाची ‘आॅन द स्पॉट’ पाहणी गुरुवारी केली. त्या वेळी बीआरटी सेवा अद्याप असुरक्षित आणि धोकादायक असल्याचे चित्र समोर आले. बीआरटी मार्गाभोवती पूर्णपणे सुरक्षा कठडे उभारले नाहीत. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे रस्ता शॉर्टकट म्हणून बीआरटी मार्गाचा उपयोग जीव धोक्यात घालून करीत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा जागावाजा करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच सप्टेंबरला बीआरटी मार्गाचे उदघाटन केले. मात्र, बीआरटी मार्ग नागरिकांसाठी सुरक्षित असल्याचे कोणतीही पाहणी व तपासणी थर्ड पार्टीकडूून करण्यात आलेले नाही. सांगवी ते किवळे मार्गावर अद्याप सर्व ठिकाणी संरक्षक कठडे बसविले गेलेले नाहीत. त्यामुळे पादचारी जीव धोक्यात घालून सर्रासपणे ये-जा करतात. दोन दिवसांपूर्वी एका पादचाऱ्याचा या मार्गावर नाहक बळी गेला. त्यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या बीआरटीएस मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी मार्गावर अनेक ठिकाणी कठडे व बॅरेकेटमध्ये रिकामी जागा, तर काही ठिकाणी बॅरेकेट तुटलेले दिसले. या छोट्याशा फटीतूनही पादचारी बीआरटीएस मार्गात घुसत आहेत. त्यामध्ये महिला प्रवाशी व पादचा-यांची संख्या सर्वाधिक आहे. औंध येथील पुणे जिल्हा रुग्णालय, थेरगाव, जगताप डेअरी, सांगवी, पिंपळे निलख येथे बिनदिक्कतपणे पादचारी बीआरटीएस मार्गातून रस्ता ओलांडताना दिसून आले. मात्र, त्याठिकाणी कोणताही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. दुभाजक ओलांडण्याची कसरत...बीआरटीएस मार्गावर काही लोखंडी बॅरकेट तुटले होते, तर काही वाकले होते. काही कठड्याचे पत्रे बाहेर आले होते. त्यामुळे जवळून जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका आहे. सुरक्षा कठडे आणि उंच दुभाजकावर उड्या मारून काही जण सहजपणे रस्ता क्रॉस करीत होते. समोरून बस आली तरी, त्यांना काहीच फरक पडत नव्हता. कठड्याला खेटून उभे राहत बसला वाट करून देण्याचा गंभीर प्रकार पहायला मिळाला. बस पुढे गेल्यानंतर सहजपणे दुभाजकावरून उडी मारून पलीकडचा रस्ता गाठण्याची कसरत केली जात आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांना सर्वाधिक धोका आहे. बॅरिगेट्सची दुरवस्थाप्रत्येक बसथांब्यावर सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, ते प्रवाशांना मार्गदर्शन करण्यापेक्षा पेपर वाचण्यात दंग दिसले. अनेक सुरक्षारक्षक खुर्चीत बसून आराम करताना दिसले. प्रवाशांच्या ये-जा करण्याकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसले. थांब्यावरील दरवाजे उघडे असले, तरी ते त्याबाबत काहीच करताना दिसत नव्हते. सुरक्षा व्यवस्था खिळखिळी...बीआरटीएस मार्गावर वाहन लावण्यास बंदी असताना त्या ठिकाणी नेमलेल्या सुरक्षारक्षक किंवा वॉर्डनने स्वत:ची दुचाकी तेथे बिनदिक्कतपणे मार्गावर लावली होती. इतर वाहनांना मात्र अटकाव केला जात होता. रस्ता क्रॉस होत असलेल्या ठिकाणी वॉर्डन थांबलेले असल्याने दुचाकी वा चारचाकी वाहने बीआरटीएसमध्ये शिरत नव्हते. बहुतेक वॉर्डन पावसात दक्ष असल्याचे चित्र होते. कोणत्याही वाहनास ते प्रवेश देत नव्हते. मात्र, अनेक सिग्नल बंद होते.