शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

शेतकऱ्यांना मालक करण्यासाठी कायदे आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

हडपसर : शेतकऱ्याला त्याचा मालाचा आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत. काही लोकं कृषी कायद्यासंदर्भात दुट्टपी ...

हडपसर : शेतकऱ्याला त्याचा मालाचा आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत. काही लोकं कृषी कायद्यासंदर्भात दुट्टपी भूमिका घेत आहे, अशी टिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

केंद्र सरकारने मंजुर केलेल्या तीन कृषी विधेयक कायद्यावरुन सध्या देशात अंसतोष निर्माण झालेले आहे. दिल्लीत या कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपच्यावतीने देशभरात शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी बैलगाडीमधून रॅली काढण्यात आली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार जगदीश मुळीक, राहुल कुल, सिध्दार्थ शिरोळे, बाबुराव पाचारणे, बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, कंत्राटी शेती करताना काही वाद झालेत तर शेतकऱ्यांना आता कोर्टात जाता येणार आहे. हे या कायद्यात आहे. राज्यातील सरकारने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवली. केळीच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे या सरकारने बदलल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता मदत मिळाली नाही.

चौकट

राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेव्हा ५० हजार रूपये हेक्टरी देऊ असे म्हटले होते. तर बागायत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात ८ हजार रूपये दिले आहेत. त्यामुळे ‘राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला'''''''' अशी स्थिती झाली आहे. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखविण्याचे काम या सरकारने केले आहे, अशा शब्दांत राज्य सरकारवर टीका केली.

फोटो : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद यात्रा काढण्यात आली.