शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेले पूल, साईडपट्ट्या अन् कच-याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:39 IST

वसुली जोरात मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष... हे चित्र पुणे-सोलापूर महामार्गाचे आहे. तुटलेल्या पुलांची वर्षानुवर्षे दुरूस्ती न होणे व रस्त्यालगतच्या खचलेल्या साईडपट्ट्या तसेच जागोजागी पडलेले

लोणी काळभोर : वसुली जोरात मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष... हे चित्र पुणे-सोलापूर महामार्गाचे आहे. तुटलेल्या पुलांची वर्षानुवर्षे दुरूस्ती न होणे व रस्त्यालगतच्या खचलेल्या साईडपट्ट्या तसेच जागोजागी पडलेले कच-याचे ढीग दिसत आहेत. प्रत्येक वेळी एखाद्याचा नाहक बळी गेल्यानंतरच शासन व्यवस्था काम करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या भागातील चारपदरी रस्त्याचे काम ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर केले. गेली १२ वर्षे टोलवसुलीचे काम नियमानुसार सुरू आहे. परंतु रस्तादुरूस्ती समवेत प्रवाशांना इतर सुविधा देण्याबाबत तसेच महामार्गालगतच्या संरक्षक जाळ्या, रुग्णवाहिका आदी सोयीसुविधा देण्याबाबत सदर कंपनी असमर्थता दाखवत आहे.नाही म्हणायला अधुनमधून महामार्गावर असलेले खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येते. पण त्यामुळे रस्त्याची उंची वाढली असून लगत असलेल्या साईडपट्ट्या न भरल्याने बºयाच ठिकाणी सुमारे एक फूट उंचीचे खड्डे पडलेले दिसत आहेत. ते भरले नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक खड्डे लोणी फाटा, कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ मंदिर व यवत दरम्यान अनेक ठिकाणी पडले आहेत.सन २००४ मध्ये चौपदरी महामार्ग तयार झाला तेव्हा मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये जनावरे व नागरिक महामार्गावर येऊन अपघात होऊ नयेत, म्हणून लोखंडी जाळी टाकण्यात आली होती. परंतु सध्या बहुतांश ठिकाणची जाळी गायब झालेली आहे.टोल कंपन्यांना महामार्गावर एखादा अपघात झाला तर जखमींना तातडीची मदत मिळावी, म्हणून अ‍ॅम्ब्युलन्स व वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेन उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु, ही सुविधाही उपलब्ध नसल्याने अपघात झाला तर पोलिसांनाच याची पूर्तता करावी लागते. तसेच रस्त्याच्या मध्यावर असलेले दुभाजक अवघे ९ इंच उंचीचे असल्याने अपघातसमयी एखादे वाहन भरधाव वेगात असेल तर थेट ते ओलांडून पलीकडे जाऊन अपघाताच्या तीव्रतेत वाढ होते. यामुळे अनेकजण प्राणास मुकले आहेत.मोठ्या प्रमाणात वाळूवाहतूक केली जाते. वाहतूक करताना वाळू महामार्गावर सांडते. या सांडलेल्या वाळूवरून अनेक दुचाकी वाहने घसरून अपघात झालेले आहेत. कधी हात-पाय मोडण्यावर भागते तर कधी दुचाकीचालकाचा जीवही जातो.