शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन तलावात अत्यल्प साठा, २८ लाख वीजबिल थकबाकीत अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:37 IST

बारामती तालुक्यातील सुप्यासह जिरायती पट्टयातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सुपे : बारामती तालुक्यातील सुप्यासह जिरायती पट्टयातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. मात्र जनाईचे पाणी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे २८ लाख वीजबिलाच्या थकबाकीत अडकले आहे. तसेच ब्रिटिशकालीन तलावातही अत्यल्प पाणीसाठा राहिलेला आहे.यावर्षी सुपे परगण्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मागील दोन महिन्यांपासून जनाई योजनेतून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. येथील शेतकरी वीजबिलाची रक्कम भरण्यास तयार होते.मात्र मागणी करूनही २८ लाख थकबाकी असल्याने पाणी सोडण्यात आले नाही.त्यामुळे अनेक गावांचे तलाव कोरडे पडल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटंकती करावी लागत आहे. सुपे येथील ब्रिटिशकालीन तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे येथे पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या तलावांतर्गत इतर गावांना नळ-पाणीपुरवठा सुरू आहे.>तलावातील पाणी कमी झाल्याने प्राण्यांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघ, संजय दरेकर यांनी दिली. दरम्यान, जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे तातडीने पाणी सोडण्याबाबत शेकडो सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पाटबंधारे प्रकल्प विभागाला दिल्याची माहिती वाघयांनी दिली.