शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ सहकार्यासाठी ब्रिटन उत्सुक

By admin | Updated: November 11, 2016 02:13 IST

देशातील महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये योगदान देण्यासाठी ब्रिटिश सरकार

पुणे : देशातील महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये योगदान देण्यासाठी ब्रिटिश सरकार व कंपन्या उत्सुक असल्याचे ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव लियाम फॉक्स यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांमध्ये सहकार्य करण्याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने शहरातील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत चाललेल्या कामांची पाहणी केली. या वेळी ब्रिटनचे उपउच्चायुक्त कुमार अय्यर, महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, संगणक विभागाचे प्रमुख राहुल जगताप उपस्थित होते.शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यासाठी शहराच्या काय गरजा आहेत याची माहिती ब्रिटनच्या शिष्टमंडळाने जाणून घेतली. शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे सादरणीकरण या वेळी करण्यात आले. शहरामध्ये वाहतूक प्रश्न, २४ तास पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी कामांसाठी कोणते तंत्रज्ञान हवे आहे याची सविस्तर चर्चा या वेळी करण्यात आली. ब्रिटनकडून काय मदत होऊ शकते याची माहिती लियाम फॉक्स यांनी दिली. पुणे व ब्रिटनमध्ये लवकरच याबाबत सहकार्याचा करार होईल असा विश्वास फॉक्स यांनी व्यक्त केला. बुधवार व गुरुवार हे शिष्टमंडळ पुण्यात होते. यानंतर कोची या शहराला शिष्टमंडळ भेट देणार आहे. (प्रतिनिधी)