शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामित्वाची आण; देऊया ‘ती’ला मान

By admin | Updated: September 7, 2016 01:41 IST

परंपरेला छेद देऊन लोकमत सखी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ती’च्या गणेशोत्सवाचा दुसरा दिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पुणे : परंपरेला छेद देऊन लोकमत सखी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ती’च्या गणेशोत्सवाचा दुसरा दिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुरोगामित्वाचे पाऊल टाकणाऱ्या लोकमतच्या ‘ती’च्या गणेशाची अनेक मान्यवर महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. दरम्यान शहरातील विविध मंडळांनी महिलांच्या हस्ते आरती केल्यास त्याचे छायाचित्र लोकमतकडे पाठवून देण्याचे आवाहन ‘ती’चा गणपतीतर्फे करण्यात आले आहे.यामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीच्या संचालिका निवेदिता काळे व इतर अ‍ॅडव्होकेट महिला, रेड ट्रीच्या संचालिका लीना सलढाणा, आमदार भीमराव तापकीर यांच्या पत्नी सुवर्णा तापकीर व त्यांच्या परिवारातील इतर महिला, सूर्यदत्ता शैक्षणिक संस्थेचे संचालक डॉ. संजय चोरडिया यांच्या पत्नी सुषमा चोरडिया तसेच अ‍ॅपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन बँकिंग अँड फायनान्स अ‍ॅकॅडमीचे अजिंक्य बिजवल व त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलाही उपस्थित होत्या. पाण्यामध्ये इंडिन नसलेल्या बोटीने तरंगण्याचा अनोखा खेळ खेळणाऱ्या तारामती मातीवडेही या वेळी उपस्थित होत्या. लोकमतच्या सखी मंचातर्फे राबविल्या जाणाऱ्या या अनोख्या उपक्रमात सार्वजनिक गणेशमंडळांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकमतप्रमाणेच पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी एक दिवस महिलांना आरतीचा मान द्यावा, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. या महिलांच्या आरतीचा फोटो मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतच्या लॉ कॉलेज रोड येथील कार्यालयात प्रत्यक्ष आणून द्यावा किंवा ंंस्र’ीुंस्रस्रं@ॅें्र’.ूङ्मे या मेलआयडीवर मंडळाचे नाव, अध्यक्षांचे नाव व संपर्कक्रमांकासह पाठवायचा आहे. या फोटोंना योग्य ती प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जाईल.