कोरेगाव भीमा : ‘माहेर’मधील निराधार कन्या पूजा हिचा पुण्यातील संतोष विलासराव बीडकर यांच्याशी थाटामाटात विवाह झाला. तिला आयुष्याचा जोडीदार मिळाल्याने सर्वानी उत्साहात स्वागत केले.
‘माहेर’च्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांनी 7क् पेक्षा अधिक निराधार मुलींचे कन्यादान करून स्वत: लग्न लावून दिले आहेत. वैधव्य पदरी आलेली पूजाची आई शांता रमेश गवळी यांना ‘माहेर’ संस्थेच्या पुढाकारामुळे मायेचा आधार मिळाला. तर, पूजाला ‘माहेर’चे प्रेमही मिळाले. आपल्या दोन मुलींसोबत शांता गवळी गेली चार वर्षे महिला सेवाग्राममध्ये काम करत होत्या. त्या वेळी काही रुग्णांना उपचाराकरिता घेऊन त्या ससून रुग्णालयात येत असत. या वेळी त्यांना माहेरच्या कार्यकत्र्याकडून माहेर संस्थेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर 2क्क्8 मध्ये मुलगी पूजा हिला घेऊन शांता गवळी माहेर संस्थेत आल्या. पूजाचे बारावीचे शिक्षण झाल्यानंतर तिने पुणो येथील सिपला हॉस्पिटलमध्ये एक वर्षाचे नर्सिगचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ती पुण्यातील एका खासगी रुग्णालयात नर्सिगचे काम करीत होती. स्वत:च्या पायावर पूजा स्थिर झाल्यानंतर माहेर संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांनी पुण्यातील नोकरदार मुलगा संतोष विलासराव बीडकर यांच्याशी तिचा विवाह ठरवला.
या वधू-वरांचा नुकताच वढू बुद्रुक येथे मोठय़ा उत्साहात विवाह झाला. यासाठी अनेक दानशूरांनी वेगवेगळ्य़ा प्रकारे लगAासाठी मदतीचा हातही पुढे करून सहकार्य केले. या विवाहसोहळ्य़ासाठी संस्थेच्या अध्यक्षा हीरा बेगम मुल्ला, व्यवस्थापक निशिकांत धुमाळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)