शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोरेगाव पार्कमध्ये जमीन वापराचा शर्तभंग

By admin | Updated: July 6, 2017 03:57 IST

कोरेगाव पार्कसाठी करण्यात आलेल्या ‘टाऊन प्लॅनिंग’चे सर्व नियम धाब्यावर बसवून गेल्या काही वर्षांत येथील रहिवास विभागात

सुषमा नेहरकर-शिंदे/लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोरेगाव पार्कसाठी करण्यात आलेल्या ‘टाऊन प्लॅनिंग’चे सर्व नियम धाब्यावर बसवून गेल्या काही वर्षांत येथील रहिवास विभागात मोठ्या प्रमाणात व्यापारी वापर केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये समोर आले आहे. शर्तभंग केलेल्यांवर लवकरच कारवाईचा बडगा उचला जाणार असून, कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्ती केली जाईल. ब्रिटिशकाळात सन १९२०-१२ मध्ये इंग्रज सरकारने मुंबईत विविध व्यवसायासाठी येणाऱ्या पारशी व अन्य व्यापरी लोकांना राहण्यासाठी पर्यायी जागा म्हणून खास कोरेगाव पार्कची निवड केली. यासाठी ब्रिटिश सरकारने कोरेगाव पार्क व शिवाजीनगर येथील भांबुर्डा दोन जागांची निवड केली. तत्कालीन जिल्हाधिकारी हडसन व महसूल आयुक्त सेदान यांनी कोरेगाव पार्कची जागा उत्तम असल्याचे सांगून या जागेची निवड केली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येथे सुमारे १९४ एकर शेतजमीन रहिवास झोनसाठी संपादित केली. यामध्ये ४० ते ५५ गुंठ्यांचे १२२ प्लॉट तयार करून लिलाव पद्धतीने त्याची विक्री केली. कोरेगाव पार्कचा विकास करताना त्या वेळच्या इंग्रज सरकारने यासाठी स्वतंत्र ‘टाऊन प्लॅनिंग’ आराखडा तयार केला. या भागाला बकालपणा येऊ नये म्हणून खास बिल्डिंग प्लॅनदेखील तयार करण्यात आला. त्यानंतर रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून दिली. इमारतीचे बांधकाम करताना अत्यंत कडक नियम लागू केले व त्यांंची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. यामध्ये मुख्य इमारत, नोकरांसाठीचे आऊट हाऊस, गॅरेज, गोठा, स्वच्छतागृहे, बाल्कनी, सीमाभिंत, पायऱ्या, उद्याने, ओटे, उघडे हौद आदी अनेक लहानमोठ्या गोष्टींचे अत्यंत स्पष्टीकरणासह नियम लागू केले. हे नियम लागू करताना तळमजला अधिक एक यापेक्षा जास्त मजली इमारत बांधता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यामध्ये या प्लॉटचा निवासी वापराव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.कोरेगाव पार्क सन १९२० ते १९५० या कालावधीत महापालिका हद्दीबाहेरच होते. महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरदेखील कोरेगाव पार्कसाठी ब्रिटिशांनी मंजूर केलेलीच बांधकाम नियमावली लागू करण्याचे आदेश १९८८मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत समावेश होऊनदेखील येथील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. अस्तित्वात असलेल्या इमारतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपाचे बदल करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतुस गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवास झोनमध्ये कमर्शियल इमारतीचे बांधकाम करण्यात आले. अनेक बंगल्यांचा व्यावसायिक कारणासाठी वापर सुरू आहे. त्यामुळे कोरेगाव पार्कमध्ये शर्तभंग केलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.शर्तभंग केलेल्यांवर कारवाईकोरेगाव पार्कमध्ये उतरेस कोरेगाव पार्क नॉर्थ रोड, दक्षिणेस रेल्वे लाईन, पश्चिमेस सर्किट हाऊस ते बंडगार्डन पूल रस्ता व पूर्वेस घोरपडी गाव यादरम्यानच्या परिसरात रहिवास झोनमध्ये कमर्शियल वापर झाला असलेल्या सर्व बांधकामांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.कोरेगाव पार्कची फाईल ‘टाऊन प्लॅनिंग’ आदर्श नमुनाइंग्रजांनी कोरेगाव पार्कसाठी लागू केलेला ‘टाऊन प्लॅनिंग’ हा अत्यंत आदर्श नमुना आहे. कोरेगाव पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात शर्तभंग झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जुन्या काळातील कागदपत्रांचा शोध घेण्यात आला. यामध्ये इंग्रजांनी तयार केलेली ही फाईल सापडली. यामध्ये असलेले नियम व अटी अत्यंत आदर्श व स्पष्ट स्वरूपात आहेत. ही फाईल ‘टाऊन प्लॅनिंग’चा एक आदर्श नमुना असल्याने शासनाने ती जतन करून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.