शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्ता घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: March 5, 2016 00:54 IST

वाहतूककोंडीने गुदमरलेला सिंहगड रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. या रस्त्यावरील वाहतूककोंडीची सद्य:स्थिती आणि त्यास जबाबदार असलेले घटक आणि ही कोंडी फोडण्यासाठी आवश्यक

पुणे : वाहतूककोंडीने गुदमरलेला सिंहगड रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. या रस्त्यावरील वाहतूककोंडीची सद्य:स्थिती आणि त्यास जबाबदार असलेले घटक आणि ही कोंडी फोडण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती ‘लोकमत’ने ‘रस्ता सिंहगडाचा; चाल मात्र कासवाची’ या वृत्ताद्वारे समोर आणल्यानंतर ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांसह महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. या वृत्तानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वाहतूक पोलीस, तसेच महापालिकेच्या टिळक रस्ता क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तातडीने कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी निवेदन दिले होते. त्याची दखल घेत शुक्रवारी दुपारनंतर दत्तवाडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त रवी पवार यांनी तातडीने या रस्त्याची पाहणी केली. तसेच या दोन्ही विभागांकडून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महापालिकेकडून वाहतूककोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, अतिक्रमणे तसेच चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणे त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूककोंडीने गंभीर रूप धारण केलेले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे शक्य असून त्याला ‘लोकमत’ने वाचा फोडलेली होती. त्याची दखल घेत महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. त्यात प्रामुख्याने वडगाव स्मशानभूमीजवळ पोलिसांनी जप्त केलेली वाहने रस्त्यावरून हटविणे, मुख्य रस्त्यावर थांबणाऱ्या प्रवासी रिक्षांवर दंडात्मक कारवाई करणे, वर्दळीच्या वेळी रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे, याशिवाय पदपथांवर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करणे अशा प्रकारची संयुक्त कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)पथारी व्यावसायिकांचेही लवकरच पुनर्वसन या रस्त्यावर प्रामुख्याने पदपथ तसेच मुख्य रस्त्यावरच पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेही वाहतूककोंडीत भर पडत असून त्यांच्या पुनर्वसनाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असून महिन्याभरात ही कारवाई पूर्ण केली जाईल. तसेच या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही, याबाबतही उपाययोजना केल्या जातील.- रवी पवार, महापालिका सहायक आयुक्त, टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडीने गंभीर रूप धारण केले आहे. ‘लोकमत’ने याचे वास्तववादी चित्रण मांडले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने पक्षाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यास सहकार्य करण्यात येईल. - रूपाली चाकणकर, महिला शहराध्यक्षा, राष्ट्रवादी