शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकडाऊन पीएमपीने शिवाजीनगर थबकले

By admin | Updated: April 17, 2016 03:03 IST

ऐन वर्दळीच्या काळात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या उड्डाणपुलाच्या परिसरात तीन बसचे ब्रेकडाऊन झाल्याने, शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांवर प्रचंड

पुणे : ऐन वर्दळीच्या काळात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या उड्डाणपुलाच्या परिसरात तीन बसचे ब्रेकडाऊन झाल्याने, शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे शनिवारी काम संपवून रविवारच्या सुटीच्या आनंदात असलेल्या चाकरमान्यांना तब्बल दीड ते दोन तास ताटकळत राहावे लागले. सायंकाळी सहा वाजता ब्रेकडाऊन झालेल्या दोन बसेस सातच्या सुमारास रस्त्यावरून बाहेर काढण्यात आल्यानंतर आणखी एक बस बंद पडल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. सायंकाळी सहाच्या सुमारास इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात पीएमपीच्या दोन बस बंद पडल्या. त्यामुळे आधीच संथ झालेली वाहतूक जागेवर थांबल्याने त्याचा परिणाम काही वेळात गणेशखिंड रस्त्यावर झाला. त्यानंतर हळूहळू या परिसरातील सर्वच रस्ते वाहतुकीने गजबजून गेले. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, या बसच्या ब्रेकडाऊनमुळे वाहनांची रांग शिवाजीनगरपासून थेट पुणे विद्यापीठापर्यंत होती. ही कोंडी फोडण्यासाठी जादा वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.(प्रतिनिधी)बस दूर करण्यास लागला दीड तासरस्त्यावर झालेल्या वाहतूककोंडीमुळे या बस बाजूला करण्यास तब्बल एक ते दीड तासाचा कालावधी गेला. त्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा अवघ्या काही वेळात कृषी महाविद्यालय चौकातील उड्डाणपुलावर आणखी एक बस बंद पडल्याने कोंडीत आणखीन भर पडली. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास आणखी विलंब लागल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. या ब्रेकडाऊनमुळे फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीरस्ता, आरटीओ; तसेच पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.