शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारूभट्ट्या उद्ध्वस्त, नारायणगावला तिघांवर गुन्हा : १ लाख १५ हजारांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:36 IST

धनगरवाडी परिसरातील तीन अवैध गावठी हातभट्टी तयार करणा-या दारूभट्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकून १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल व गावठी हातभट्टी दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली.

नारायणगाव : धनगरवाडी परिसरातील तीन अवैध गावठी हातभट्टी तयार करणा-या दारूभट्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकून १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल व गावठी हातभट्टी दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. या प्रकरणी नीलेश विजय मारवाडी, बेबी युवराज बिनावत, रिना आनंदा राजपूत (सर्व रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) यांना अटक करण्यात आली असून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगरवाडी येथे गावठी हातभट्टी तयार करण्यात येत असल्याच्या माहिती पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पथक तयार करून मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास धनगरवाडी येथे चिक्कूच्या बागेजवळ जाणा-या रोडजवळ नीलेश मारवाडी याच्या घराजवळ गावठी हातभट्टी तयार दारू, कच्चे रसायन, इतर साहित्य, दुचाकी असे ९२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्यानंतर बेबी युवराज बिनावत यांच्या घराजवळ १० लिटर गावठी दारू, २०० लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन व इतर साहित्य असे ११ हजार रूपयांचा मुद्देमाल सापडला. दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गोरड व ८ कर्मचा-यांनी केली.>दौंडला ९ ठिकाणी दारूअड्ड्यांवर छापेदौंड : शहरात वेगवेगळ्या ९ ठिकाणी अवैध दारूअड्ड्यांवर पोलीसांनी छापा टाकून ७ जणांना अटक केली आहे. दोघे जण फरार झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार सुनील बगाडे यांनी दिली. जरिना राठोड, नवनाथ काळे, शांताराम पवार, बबिता देवकाते, राजू जाधव, विशाल कुट्टी यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, गजानन जाधव, भानुदास जाधव, अमोल गवळी, असिफ शेख, राजू शिंदे, तन्वीर सय्यद, धनंजय गाढवे या पोलिसांनी ठिकठिकाणी छापा टाकून ३४०० रुपयांची दारू जप्त केली. यात ५०० लिटर रसायन जप्त केले आहे.> अवैध गावठी दारूधंद्यांवर वालचंदनगर पोलिसांचे छापेवालचंदनगर : कळंब, चिखली, वालचंदनगर परिसरात विविध ठिकाणी अवैध गावठी दारूविक्री करणा-यावर वालचंदनगर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यादरम्यान पोलिसांनी मुद्देमालासह विविध साहित्य जप्त केले. कळंब, चिखली परिसरात गावठी अवैध देशी दारूविक्री केले जात असल्याची खबर मिळाल्याने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, त्याचे सहकारी यांनी छापा टाक ला. या वेळी सुनील किसन सोनवणे (रा. नारळीबाग, कळंब) यांच्याकडील ५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आले.