शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

वाळूसम्राटांवर धाडसी कारवाई

By admin | Updated: July 3, 2015 00:10 IST

तालुक्यातील गिरवी गावाच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करून साठा केलेल्या वाळूसम्राटांवर महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत २ हजार

इंदापूर : तालुक्यातील गिरवी गावाच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करून साठा केलेल्या वाळूसम्राटांवर महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत २ हजार ९४३ ब्रास वाळूचा साठा जप्त केला. वाळूमाफियांवर तब्बल ४ कोटी ४१ लाख ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. इंदापुरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सूर्यकांत येवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारपासून (दि. १) वाळूसाठा करणारांविरुद्ध आज (२ जुलै) सायंकाळपर्यंत धडक कारवाई केली. मंडल अधिकारी ता. भ. पवार (काटी), एस. बी. शिंदे (बावडा), अविनाश डोईफोडे (निमगाव केतकी), सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी. आर. धुमाळ, तलाठी बी. एन. तिकोटे (पिंपरी बुद्रुक), आय. आर. कोळी (सराटी), ए. व्ही. मुळे (नरसिंहपूर), बी. व्ही. आव्हाड (बावडा), एस. टी. यादव (निरनिमगाव), जी. एस. बारवकर (रेडा), राजू पिसाळ (खोरोची), एस. टी. बिराजदार (भांडगाव), औदुंबर शिंदे (अवसरी) यांनी कारवाईत भाग घेतला. सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे व त्यांचे सहकारी राजेंद्र चव्हाण व इतरांच्या बंदोबस्तात कारवाई पार पडली. (वार्ताहर)कारवाई पुढेही चालूच राहणार तहसीलदार सूर्यकांत येवले म्हणाले, की २ हजार ९४३ ब्रास वाळूची मूळ किंमत ८८ लाख २९ हजार रुपये होते. त्याच्या पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे. ही कारवाई पुढेही चालूच राहणार आहे.कारवाई करण्यात आलेल्या वाळूसाठा करणारांची नावे व त्यांच्याकडील वाळूसाठा ब्रासमध्ये असा : नामदेव गजानन कोरे (२०३ ब्रास), हर्षवर्धन पांडुरंग क्षीरसागर व इतर दोघे (१ हजार ३२ ब्रास), प्रकाश सोनदेव कोकाटे (२६ ब्रास), गणेश मल्हारी जगताप (२९० ब्रास), बाबासाहेब भीमराव क्षीरसागर (७६ ब्रास), तानाजी भगवान क्षीरसागर (१२६ ब्रास), पोपट ज्ञानदेव क्षीरसागर (३५ ब्रास), हनुमंत बिभीषण क्षीरसागर (६३ ब्रास), लालासाहेब साहेबराव क्षीरसागर (१०२ ब्रास), रणजितसिंह तुकाराम गायकवाड (१०२ ब्रास), सतीश आगतराव क्षीरसागर (८१ ब्रास), विशाल चांगदेव क्षीरसागर (४२ ब्रास), दिलीप कृष्णा देठे (१२२ ब्रास), ज्ञानदेव माणिक क्षीरसागर (७२ ब्रास), भगवान राजाराम क्षीरसागर (८३ ब्रास), दत्तात्रय माणिक क्षीरसागर (११९ ब्रास), शहाजी माणिक क्षीरसागर (१११ ब्रास), बाळासाहेब माणिक क्षीरसागर (८४ ब्रास), चंद्रकांत खाशाबा क्षीरसागर (१२२ ब्रास).भीमापात्रात वाळूउपसा करणाऱ्या विरोधात गुन्हालोणी काळभोर : हवेली तालुक्यातील डोंगरगावच्या हद्दीतील भीमा नदीपात्रात अनधिकृतपणे सुमारे २५ लाख रुपयांचा वाळूउपसा केल्याबद्दल एका वाळू व्यावसायिकाविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ५ पोकलेन, ४ ट्रक, ४ ट्रॅकर, २ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत़ हवेलीचे नायब तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले, की गणेश फडतरे या वाळू व्यावसायिकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फडतरे हा अवैधपणे वाळूउपसा करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून उरुळी कांचनचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, वाघोलीचे तलाठी संजय भोर, गुलाब दिघे, मधुकर वांबळे व लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर. ए. पारखे यांनी आपल्या पथकासमवेत नदीपात्रात धाड टाकली़ परंतु पोलीस व महसूल विभागाच्या पथकाची चाहूल लागताच पोकलेन, ट्रक, ट्रॅक्टर चालकांनी व कामगारांनी ती वाहने तेथेच सोडून पलायन केले. चौकशीअंती गणेश फडतरे याने विविध वाहनांच्या मदतीने वाळूउपसा केल्याचे निष्पन्न झाले .डोंगरगावच्या नदीपात्रातील वाळूचा ठेका संबंधित वाळू ठेकेदाराने घेतला होता़ परंतु लिलावाची पूर्ण रक्कम सरकारी तिजोरीत न भरल्यामुळे ठेकेदाराला त्या ठिकाणचा ताबा दिलेला नसताना व ताबा पावती झालेली नसताना अनधिकृतपणे वाळू उपसा करत असल्यामुळे त्याचेवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)