शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावा

By admin | Updated: April 1, 2017 02:18 IST

देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे

पुणे : देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सध्याचे ब्रेकडाऊनचे प्रमाण २० ते ३० टक्के असून, ते दहा टक्क्यांपर्यंत खाली आणावे, असा आदेश त्यांनी सर्व आगारप्रमुखांना दिला आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच महत्त्वाचे निर्णय घेऊन पीएमपीच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी कामाची वेळ बदलण्याचा पहिला निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी कामावर वेळेत न आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचा दिवस विनावेतन करण्यात आला. ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठीही आता त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सद्यस्थितीत पीएमपीच्या २७५ ते ३०० बस दररोज मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच पीएमपीला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. पीएमपीची प्रतिमाही खराब झाली आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या व भाडेतत्त्वावरील एकूण २०३६ बसेस असून, त्यातील सुमारे १३०० ते १४०० बसेस दररोज मार्गावर असतात. मात्र त्यातील सरासरी २७५ ते ३०० बसेस रोज अनेक कारणांमुळे ब्रेकडाऊन होत आहेत. सध्या हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांच्या घरात आहे. हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी अनेक बस सातत्याने बंद पडतात. त्यासाठीही मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले असून, त्याबाबत सर्व आगारप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.सर्व आगारात ई-तिकिटिंगपीएमपीच्या सर्व आगारांमध्ये ई-तिकिटिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मी-कार्डचा वापर  करणे सर्व आगारांसाठी शक्य होणार आहे. आतापर्यंत ११ आगारांमध्येच ई-तिकिटिंगचा वापर होत होता. उर्वरित दोन आगारांमध्येही ही  ई-तिकिटिंग यंत्रे उपलब्ध झाली आहेत. मी-कार्डसाठी हे यंत्रणा आवश्यक आहे.