शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ब्रेल लिपीला हवी आधुनिकतेची जोड

By admin | Updated: January 4, 2016 00:57 IST

शासनाच्या विविध योजनांमधून अंधासाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक

चिंचवड : शासनाच्या विविध योजनांमधून अंधासाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक त्या सुविधांपासून वंचित राहत आहेत. ब्रेल लिपीने अंधांना दिशा दिली असली, तरीही या शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाल्याशिवाय अंध बांधवांचे जीवन प्रकाशमय होणार नाही, असे मत अंध शिक्षणप्रणालीत कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.अंध व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु यातील उदासीन धोरणांमुळे याची अंमलबजावणी होत नाही. अंध बांधव अशा योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंध:कारमय बनू लागले आहे. शासनाच्या योजनांची पांढरीकाठी काठी अंधांच्या हाती कधी पडणार, असा सवाल त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित होत आहे.अंधांच्या समस्या व शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी अग्रेसर असणारे सतीश नवले यांनी अंध व्यक्ती हा समाजाचा उत्पादक घटक बनू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. १९८० नंतर समावेशक शिक्षण व २००३ ते ४ पासून सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत सर्वसामान्यांच्या शाळेत अंधांना शिक्षणाची परवानगी दिली आहे. परंतु अंध असल्याने अशा विद्यार्थ्याला सहानुभूती दाखवून व त्यांच्यावर दया करून त्याला सवलती देण्यापेक्षा त्याला स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे. यामुळे अंध व्यक्तीच्या गरजा व आवाहने पूर्ण होऊ शकतील. यातून मिळणारे शिक्षण लाभदायी व रोजगारयुक्त होऊ शकते. अंध व्यक्ती उत्पादक घटक बनल्यास पालकांना व समाजाला त्याचा भार वाटणार नाही. त्यांना जखडवून ठेवत अंधत्वाचे भांडवल करण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)