शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांचाच बैठकीवर बहिष्कार

By admin | Updated: December 23, 2015 00:13 IST

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाहन पुरविण्याच्या टेंडर मान्यतेवरून स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम व काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसनेच्या सदस्यांमध्ये मंगळवारी जोरदार खडाजंगी झाली

पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाहन पुरविण्याच्या टेंडर मान्यतेवरून स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम व काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसनेच्या सदस्यांमध्ये मंगळवारी जोरदार खडाजंगी झाली. यावरून कदम या बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडल्या. त्यानंतर सदस्यांनी सभा पुढे चालू ठेवून वाहन पुरविण्याचा विषय मंजूर करून घेतला. स्थायी समितीच्या बैठकांमध्ये वारंवार होणाऱ्या वादामुळे प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. महापालिकेच्या स्थानिक संस्था कर, पाणीपुरवठा, क्षेत्रीय कार्यालये व मनपाकडील इतर विभागांना शासकीय कामांसाठी भाडेतत्त्वावर वाहने पुरविण्याचे दोन प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडले होते. यापूर्वी ४ वेळा हा विषय पुढे ढकलण्यात आला होता. मंगळवारच्या बैठकीत हा विषय आला असता, प्रशासनाने त्या विषयावर अद्याप अहवाल दिला नसल्याने तो पुढे ढकलावा, अशी भूमिका अश्विनी कदम यांनी घेतली.स्थायी समितीमधील काँग्रेस, भाजप, मनसे व शिवसेनेच्या सदस्यांनी याला आक्षेप घेतला. प्रशासकीय काम वेगाने मार्गी लावण्यासाठी हा विषय मंजूर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. समितीच्या अध्यक्षांनी या विषयावर मतदान घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्याला कदम यांनी नकार दिला. हा विषय आपण मतदानाला टाकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बैठकीचे कामकाज अर्धा तास थांबून राहिले. त्यानंतर समितीचे काही सदस्य आपणास जाणूनबुजून टार्गेट करीत असल्याचा आरोप करून कदम यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.बैठक तहकूब झाली नसल्याने इतर पक्षांच्या सदस्यांनी सभा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रसचे सदस्यही बैठकीतून बाहेर पडले. इतर पक्षांच्या सदस्यांनी समितीमधील ज्येष्ठ सदस्य मुकारी अलगुडे यांची बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवड करून सभेच्या पुढील कामकाजाला सुरुवात केली. अधिकाऱ्यांना वाहन पुरविण्याचा एक कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बैठकीतून बाहेर पडल्यानंतरही ५ पेक्षा जास्त सदस्य बैठकीला उपस्थित असल्याने कोरम पूर्ण होत असल्याने अध्यक्षांच्या बहिष्कारानंतर झालेले कामकाज नियमानुसार झाल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)