शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

By admin | Updated: January 10, 2017 02:39 IST

स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही अद्याप भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य

भोर : स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही अद्याप भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणी शिक्षण या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नाहीत. त्यामुळे भुतोंडे, गृहिणी, कुंबळे या ग्रामपंचायतींअंर्तगत असलेल्या ८ गावांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.याबबतचे निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रधान सचिव व पालमंत्र्यांना दिले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी भोरपासून सुमारे ५५ किलोमीटरवर भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भुतोंडे, खुलशी-गृहिणी, चांदवणे, बोपे, कुंबळे, डेरे, खिळदेववाडी ही गावे आहेत. स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही अद्याप जिल्हा मार्गासह अंर्तगत पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे अनेक गावांत वाहन चालविणे अवघड होत आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांत वाहने जात नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागते. प्राथमिक शाळा आहेत; मात्र तेथे मुलांना शिकविण्यासाठी पुरेशा प्रमाणात शिक्षकच नाहीत. या भागात शाळा मिळाली तर शिक्षक तेथे रुजूच होत नाहीत. कारण तेथे राहणे म्हणजे त्यांना मोठे संकट वाटते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत वारंवार मागणी करूनही शिक्षक उपलब्ध होत नाहीत. वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दर पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होतो. तो चार महिने गायब असल्याने गावे अंधारातच राहतात. रात्रीअपरात्री घराबाहेर पडता येत नाही. मोबाईल टॉवर नसल्याने कोणत्याच मोबाईलला रेंज नसल्याने संर्पक होत नाही. काही काम असल्यास ५५ किलोमीटर दूर भोरला येण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही.येथील लोकांना उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्याने रोजगार हमी योजनेचे काम करून चार रुपये मिळविले जातात. मात्र, मोबाईल रेंज नसल्याने पोस्टाचे आॅनलाईन काम बंद राहते. रोजगार हमीवर काम करणाऱ्या लोकांना पैसे मिळत नसल्याचे भुतोंडेचे सरपंच संतोष उफाळे व कैलास रेणुसे यांनी सांगितले.वरील विविध समस्यांबाबत संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आठ गावांतील नागरिकांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी उपसभापती भगवान कंक यांनी सांगितले.