शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ढेमेवस्तीत दोघांना घरात घुसून मारहाण

By admin | Updated: March 15, 2016 04:00 IST

दौंड-गोपाळवाडी रोड परिसरातील ढमेवस्ती येथे बंगल्यात राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल बारवकर (वय ६0), त्यांची पत्नी रेखा बारवकर (वय ५६) यांना त्यांच्या बंगल्यात

दौंड : दौंड-गोपाळवाडी रोड परिसरातील ढमेवस्ती येथे बंगल्यात राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल बारवकर (वय ६0), त्यांची पत्नी रेखा बारवकर (वय ५६) यांना त्यांच्या बंगल्यात घुसून चार व्यक्तींनी जबर मारहाण केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रेखा बारवकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रतीक जाधव, विकी रणसिंग (दोघेही रा. दौंड) व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्या विरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार डी. जे. भाकरे यांनी दिली. आम्ही पती-पत्नी न्यायालयात सुरूअसलेला खटला मिटवून घेत नसल्याच्या कारणावरून गज व तीक्ष्ण हत्याराने आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे रेखा बारवकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास बारवकर यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.दरम्यान अनिल बारवकर यांच्या डोक्यात, हातावर तसेच त्यांच्या पत्नीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या वेळी दोघेही पती-पत्नी जोरजोरात ओरडून मदतीची याचना करत होते. हल्लेखोरांपैकी एकाने तातडीने बंगल्यातील बारवकर यांचा मुलगा आणि सून यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली. दोघा पती- पत्नीवर वार झाल्यानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे या घटनेचा तपास करीत आहेत. (वार्ताहर)