शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

बनावट नोटाप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: April 12, 2016 04:27 IST

झोपड्यांमध्ये, तसेच चाळीत राहणाऱ्या परप्रांतीयांकडे लाखो रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. बांग्लादेश व भारत सीमेवरील पश्चिम बंगाल राज्यातून आलेल्या व्यक्ती

पिंपरी : झोपड्यांमध्ये, तसेच चाळीत राहणाऱ्या परप्रांतीयांकडे लाखो रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. बांग्लादेश व भारत सीमेवरील पश्चिम बंगाल राज्यातून आलेल्या व्यक्ती तेथून आणलेल्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. पिंपरी पोलिसांनी एक महिला व एक पुरुष अशा दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस. बी. कलांडीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. कापसे चाळ, पिंपरी येथे समसुद्दीन रेहमान शेख (वय ३०) राहत असलेल्या घराची झडती घेतली असता, एक हजाराच्या १०६, पाचशेच्या ६ बनावट नोटा आढळून आल्या. तसेच १०० च्या ८४ खऱ्या नोटाही आढळून आल्या. घरात ठेवलेल्या एका बॅगेत नव्याने खरेदी केलेल्या संसारोपयोगी वस्तू आढळून आल्या. नोटा आणखी कोणाकडे दिल्या आहेत का, असे विचारले असता, नात्याने सावत्र सासू असलेल्या जोहार मन्सूर शेख (वय ५५, रा. भाटनगर, पिंपरी) यांच्याकडे नोटा दिल्या असल्याचे त्याने सांगितले. तिच्या घराची झडती घेतली असता, एका स्टिलच्या डब्यात एक हजाराच्या ६१, ५०० रुपयांच्या दोन नोटा मिळून आल्या. तसेच १०० रुपयांच्या २३ खऱ्या नोटा, १० रुपयांच्या खऱ्या ४२ नोटा आढळून आल्या.बनावट नोटा चलनात आणून त्यातील काही रकमेचे संसारोपयोगी साहित्य खरेदी करून ठेवल्याचे आढळून आले. महिला आणि पुरुष या दोन्ही आरोपींकडून १ लाख ७१ हजारांच्या बनावट नोटा, तसेच ११ हजार ४८० रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडील मोबाइल, बँक पासबुक, मोबाईल, तसेच पॅनकार्ड आणि अन्य कागदपत्रेही जमा करण्यात आले आहेत. दरम्यान अनेक जणांना बनावट नोटांचा फटका बसला असून, बँकेत पैसे जमा करताना नोट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी नोटा जप्त केल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे.परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, तसेच पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक काळे, पोलीस उपनिरक्षक हरिश माने, आर आर ठुबल,सहायक पोलीस निरीक्षक एस बी पाटील, हवालदार इनामदार लकडे, जावळे, पाटील, खोडगे, महानवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.(प्रतिनिधी)पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून संपूर्ण देशात मजूर पुरवले जातात. भारतात विशेषत: महाराष्ट्रात येणारे हे मजूर हातगाड्यांवर ज्यूसविक्री वा अन्य व्यवसाय करतात. हे छोटे व्यवसाय त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नसते. पश्चिम बंगालमधून आणलेल्या बनावट नोटा चलनात आणून त्यावर मिळणारी टक्केवारी हेच त्यांचे खरे कमाईचे साधन आहे. तेथून आणलेल्या हजाराच्या नोटा चलनात आणून मिळणाऱ्या खऱ्या नोटा पाठवून द्यायच्या त्यावरील टक्केवारी स्वत:ला घ्यायची. हजाराची नोट द्यायची शंभर ते दीडशे रुपयांचे साहित्य दुकानातून खरेदी करायचे, दुकानदाराकडून मिळणारी खऱ्या नोटांच्या स्वरूपातील उर्वरित रक्कम ज्यांच्याकडून बनावट नोटा आणल्या, त्यांना परत पाठवायची, असे उद्योग सुरू आहेत.पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव, ताथवडे या परिसरात अशा बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणल्या जात आहेत. शहराच्या आजूबाजूच्या परिसरात आठवडा बाजारात बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. चार महिन्यात जोहरा शेख या महिलेने साडेचार लाख रूपये पाठवून दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अशा आरोपींकडे झोपड्यांमध्ये लाखो रूपये आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तू मुबलक प्रमाणात आढळून येऊ लागल्या आहेत.