शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी दोघांना भोसरीत अटक

By admin | Updated: April 26, 2017 03:46 IST

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पुढे काही अंतरावर असलेल्या झोपडीतील एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.

पिंपरी : भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पुढे काही अंतरावर असलेल्या झोपडीतील एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी मृतदेहाची ओळख पटली असून, दोन आरोपीसुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत. सोन्या उर्फ संतोष मधुकर (वय २०, भोसरी), विकी उर्फ विकास रामचंद्र सोमवंशी (वय १९, दिघी रोड, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप दिनकर कुटे (रा. भोसरी, मूळ गाव बीड) हा या परिसरात मजुरी करत असे. सोमवारी दोन जणांनी त्याचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना मोबाईल हिसकावण्यात यश आले नाही. त्यातील एकाने काही झाले तरी तो माबाईल मिळवायचा असा निश्चय व्यक्त करून साथीदाराला घेऊन प्रदीपच्या मागावर गेला. त्याच परिसरात प्रदीप त्यांना दिसून आला. त्यांनी मोबाईल हिसकावण्याचा पुन्हा प्रयत्न केला. त्यांच्यात झटापट झाली. त्या वेळी आरोपींनी त्याला दगड मारले. दगडाचा मार लागल्याने तो कोसळला. मृत झाल्याचे लक्षात येताच, विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मृतदेह ओढत नेला. झुडपात मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)