शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

चोरराजासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:00 IST

पुणे : दिवसा घरफोडी करणा-या चोरराजासह दोघांना अटक करून गुन्हे शाखेने त्यांच्याकडून ५२ घरफोड्या उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.

पुणे : दिवसा घरफोडी करणा-या चोरराजासह दोघांना अटक करून गुन्हे शाखेने त्यांच्याकडून ५२ घरफोड्या उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे १६१ तोळे सोन्याचे दागिने, २ दुचाकी आणि घरफोडीचे साहित्य असा ४६ लाख ५८ हजार ७४० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. राजेश राम पपूल ऊर्फ चोरराजा (वय ३१, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली़ चोरराजा याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गेल्या ३ महिन्यांपासून मागावर होते़ त्यांना पकडण्यासाठी योजना तयार करण्यात आली होती़ पण, तो सातत्याने साथीदार व घरे बदलत असल्याने हाती लागत नव्हता़ प्रॉपर्टी सेलच्या पथकाचे पोलीस नाईक यशवंत खंदारे व हवालदार अनिल उसुलकर यांना चोरराजा व त्याचा साथीदार येवलेवाडी येथील न्यू रोशनी हॉटेल येथे आल्याची माहिती मिळाली़ त्याबरोबर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे केलेल्या तपासात ५२ घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली़ त्यात २०१६ मधील २१ आणि २०१७ मधील ३१ घरफोड्यांचा समावेश आहे़ त्यांच्याकडून तसेच चिखली येथील घरातून, मित्राकडून आणि एका सोनाराकडून या घरफोड्यांमधील ऐवज जप्त केला आहे़ही कामगिरी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक इजाज शिलेदार, पोलीस हवालदार अनिल उसुलकर, अमोल भोसले, यशवंत खंदारे, दिनकर भुजबळ, सुभाष कुंभार, दत्ता गरुड, संजय जगताप, संजय सुर्वे, संभाजी गायकवाड, अनिल शिंदे, निजाम तांबोळी, संजय ढोले यांनी कामगिरी केली आहे़याबाबत सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी सांगितले, की राजेश ऊर्फ चोरराजा याच्या आईवडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले़ तो वर्षाच्या ७ व्या वर्षापासून चोºया करू लागला़ त्याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर २००४ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता़ यापूर्वी त्याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल होते़ फेबु्रवारी २०१६ मध्ये तो तुरुंगातून सुटून आल्यानंतर पुन्हा घरफोड्या करू लागला़ तो आपल्याबरोबर नेहमी नवीन साथीदार घेत असे़ ज्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नाहीत त्याच सोसायटीत तेही दिवसा घरफोड्या करीत असे़ घर बंद असल्याचे पाहिल्यानंतर कडीकोयंडा तोडून आत शिरून २० मिनिटांत घरफोडी करून तो पसार होत असे़ त्याची एकूण चार वेगवेगळ्या ठिकाणी घरे होती़ त्याने दोन लग्ने केली असून, त्याचे साथीदार त्याला चोरराजा म्हणून ओळखत़ तेच नाव पुढे कायम झाले़>घरफोड्यांच्या संख्येत घटगेल्या दोन वर्षांची तुलना करता यंदा घरफोड्यांच्या संख्येत घट झाली आहे़ २०१६ मध्ये १०४४ घरफोड्या झाल्या होत्या़ त्यापैकी ४९८ उघडकीस आल्या होत्या़ २०१७ मध्ये नोव्हेंबरअखेरीस ९११ घरफोड्या झाल्या असून, त्यापैकी दिवसा २६६ आणि रात्री ६४५ घरफोड्या झाल्या आहेत़ त्यापैकी ४०७ उघडकीस आल्या आहेत़