शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

पुण्याचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

By admin | Updated: May 4, 2017 02:51 IST

पुण्याच्या मुला-मुलींच्या संघाने अनुक्रमे औरंगाबाद आणि नाशिक संघाचा पराभव करून राज्यस्तरीय आंतरजिल्हा युथ

पुणे : पुण्याच्या मुला-मुलींच्या संघाने अनुक्रमे औरंगाबाद आणि नाशिक संघाचा पराभव करून राज्यस्तरीय आंतरजिल्हा युथ बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने इंदिरा नॅशनल स्कूलच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या झालेल्या लढतीत ओम पवार (१०), प्रीतेश कोकाटे (१२) यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पुणे संघाने औरंगाबाद संघाचा ६३-६१ असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करून अंतिम चारमधील आपली जागा निश्चित केली. पराभूत औरंगाबाद संघाकडून प्रणय वसय्याने २३ आणि हर्षवर्धन अटकारेने २० गुण केले. मुलींच्या गटात पुणे संघाने नाशिक संघाचा ५२-२० गुणांनी धुव्वा उडविला. पुणे संघाकडून इशा घारपुरेने १०, निधी पार्लेचाने ६, सुधीक्षा कुलकर्णीने ६ गुण करून संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. पराभूत नाशिक संघाकडून अदिती शेट्टीने १३ गुण करून एकाकी लढत दिली. निकाल (उपांत्यपूर्व फेरी) : मुले : मुबंई साऊथ वेस्ट : ५४ गुण (अहमद शेख १३, दानिश सय्यद ९) वि. वि. मुबंई साऊथ ईस्ट : ४१ गुण (बिला खान १३, तन्वीर शेख ७०; नागपूर : ६८ गुण : वरून आहूजा १४, सुमेध निपाने १३) वि. वि. चांद्रपूर : २७ गुण (हिमांशू गायकवाड १४, र्हेल मोरोटकर १२); मुंबई नॉर्थ : ६९ गुण (अर्जुन यादव १९, कमलेश राजभर १८) वि. वि. बीड : ३३ गुण (गणेश धोत्रे ६, श्रेयश दगडे ११); मुली (उपांत्यपूर्व फेरी) : धुळे : ६१ गुण (वैष्णवी हजारे १२, करिना सूर्यवंशी १२) वि. वि. सातारा : ५२ गुण (श्रुती भोसले ३०, चैतन्या राजे ६); नागपूर : ४७ गुण (देवश्री आंबेगावकर १४, दवीती संघाणी ११) वि. वि. औरंगाबाद ३९ गुण (खुशी डोंगरे २५, शर्वनी इंदूलकर १०); मुबंई नॉर्थ : ४६ (तनिषा मालवणकर १३, सुझानी पिंटो ९) वि. वि. कोल्हापूर : ३१ गुण (रिया रुईकर ८, अश्विनी चरणकर ६). (क्रीडा प्रतिनिधी)