पुणे : शनिवार पेठेतील ओंकारेश्वरासमोरील एका गल्लीत राहणारे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर अन्य एका रस्त्यावर राहणारे दोन उमेदवार पराभूत झाल्याची उदाहरणे दोन मतदारसंघांत झाली आहेत.भाजपचे गिरीश बापट आणि विजय काळे ओंकारेश्वरासमोरील गल्लीत जवळ राहतात. कसबा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर आणि काँग्रेसचे रोहित टिळक नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर राहतात. खडकवासला मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्रीरंग चव्हाण-पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजाभाऊ लायगुडे हेही एकाच भागात राहतात. एकाच गल्लीतील दोघांचा विजय हा सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे.(प्रतिनिधी)
एकाच गल्लीतले दोघे आमदार
By admin | Updated: October 19, 2014 22:56 IST