--
नसरापूर : भोर तालुक्यातील नऱ्हे येथील शेतकऱ्याच्या शेतातील तिन लाख किंमतीचा जेसीबीचा ब्रेकर चोरून विकण्याच्या तयारीत असताना राजगड पोलिसांनी शिरवळ (जि. सातारा) येथून तिस लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटतक करण्यात आली. प्रफुल्ल ज्ञानेश्वर काटकर(वय ३५), अक्षय राजेंद्र काटकर(वय२५ दोघे रा. हरतळी, सातारा) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल साबळे व त्यांच्या पथकाने शिरवळ येथे जाऊन केलेल्या कारवाईत चोरीस गेलेला जेसीबीचा ब्रेकर आणि यासाठी मदत घेण्यासाठी आलेला ट्रॅक्टर, ट्रॉली, जेसीबी असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याकरिता नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि राहुल साबळे,सहाय्यक फौजदार ए. बी. खोमणे, निवास जगदाळे,पो.ना. नाना मदने, गणेश लडकत,पो. कॉ. योगेश राजीवडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
याबाबत स पो नि साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार नऱ्हे( ता. भोर) गावचे हद्दीतील हनुमंत काशीनाथ विर यांचे रानातून मोकळ्या जागेत ठेवलेला 3DX कंपीनीचा जेसीबीचा (एमए. १२, क्यु ए. ००८४) काळ्या रंगाचा ब्रेकर गेल्या महिन्यात चोरीस गेला होता. त्याबाबत फिर्यादीने अज्ञात चोरट्याविरुध्द कायदेशीर फिर्याद दिली होती. या दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्या प्रमाणे आरोपीच्या राहते घरी शोध घेवून आरोपींना ताब्यात घेत संबंधित गुन्हयाचे माहिती घेऊन आरोपींनी हा गुन्हा जेसीबी व ट्रॅक्टरचे साहयाने केले असल्याचे कबूल केले. गुन्ह्यात आणखीन कोणी साथीदार आहेत का हे राजगड पोलिस तपास करीत आहेत.
--
फोटो क्रमांक : २२भोर नसरापूर जेसीबी
सोबत फोटो व ओळ : जेसीबी ब्रेकर चोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींसह राजगड पोलिस
220721\22pun_2_22072021_6.jpg
फोटो क्रमांक : २२भोर नसरापूर जेसीबी सोबत फोटो व ओळ : जेसीबी ब्रेकर चोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींसह राजगड पोलिस