शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बोेरीबेलकरांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:09 IST

रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौैंड : रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. रेल्वे प्रशासन ग्रामस्थांच्या जिवाची हमी घेत नाही तोपर्यंत रूळावरील मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखून धरली.सुरेश सूर्यवंशी (वय ६५), कार्तिक खळदकर (वय ३, दोघेही रा. बोरीबेल, दौंड) या दोघांचा यात मृत्यू झाला. हे दोघे रेल्वे रूळ ओलांडून गावात येत होते. भरधाव वेगाने मुंबईकडे धावणाºया उद्यान एक्स्प्रेसने चिरडले.ही घटना समजताच ग्रामस्थांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत रेल्वे प्रशासन रेल्वे फाटक किंवा पादचारी पूल उभारण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही. इंद्रायणी एक्स्प्रेस यामुळे सुमारे एक तास थांबून राहिली.काही वेळानंतर घटनास्थळी रेल्वेचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवासिंज बाविस्कर, रेल्वे सुरक्षा बलाचे सातपुते आले. त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. परिणामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने उद्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो मार्ग काढू, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे बोरीबेल गावावर शोककळा पसरली आहे.रेल्वे दुर्घटनेचा २0वा बळीबोरीबेल रेल्वे स्थानक परिसरात ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे फाटक नाही. गाव दोन विभागांत विस्तारीत झाले असल्याने गावात ये-जा करण्यासाठी नाईलाजास्तव रूळ ओलांडावे लागतात. गेल्या १0 वर्षांत १८ ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले आहेत.गेल्या ३0 वर्षांपासून खासदार, आमदार, रेल्वे प्रशासनाकडे ग्रामस्थ सुरक्षेची मागणी करीत आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. जर ३0 दिवसांत प्रशासनाने उपाययोजना केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.- हनुमंत पाचपुते, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ