सासवड-कोंढवा रस्त्यालगत असणाऱ्या बोपगावातील बरीच मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपला पारंपरिक ऊस रसवंतीचा व्यवसाय करतात.
सर्वच बाबतीत गाव समृद्ध असलेने येथून मागच्या सर्वच प्रकारच्या निवडणूका अटीतटीने लढल्या जात होत्या. या निवडणुकीचे दुष्परिणाम गावाने व गावकारभाऱ्यांनी सोसले होते.
यावेळी गावातील सर्व प्रकारच्या अनेक गोष्टीवर लक्ष घालून गावातल्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबी लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षांच्या युवा पदाधिकाऱ्यांनी व गावातील जाणकार ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी यावेळी होणारा खर्च, भांडण तंटा टाळण्यासाठी एकत्रित येऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे ठरवले. गावातील होतकरू महिलांना यावेळी ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळायला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
नऊ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी असलेल्या आरक्षणानुसार चिठ्ठी लिहून दोन महिलांना अडीच अडीच वर्ष कारभार करण्याची संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बिनविरोध निवड झालेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र.१: हर्षदा काळूराम पवार, प्रियंका शामराव फडतरे, शालन अर्जुन फडतरे, प्रभाग क्र २: स्वाती दिनकर फडतरे, ज्योती कुंडलीक फडतरे, सुवर्णा मधुकर जगदाळे, प्रभाग क्र. ३: सारिका कृष्णा गुरव, संजीवनी म्हस्कू फडतरे, सुषमा साहेबराव फडतरे.
०७ गराडे
बोपगाव (ता. पुरंदर) गावाने ग्रामपंचायतीसाठी बिनविरोध निवडून दिलेल्या महिला.