शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

पुणे : पालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या, तसेच पालिकेच्या हद्दीतील अंध शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक ...

पुणे : पालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या, तसेच पालिकेच्या हद्दीतील अंध शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली क्रमिक पुस्तके देण्यात येणार आहेत. विविध विषयांच्या एकूण ९४ हजार ५५४ पुस्तक खरेदीसाठी ५० लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. ही रक्कम ‘बालभारती’ संस्थेला अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

याबाबत माहिती देताना रासने म्हणाले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासन मोफत पुस्तके देते. मागील चार वर्षांपासून आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या आणि मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना पालिका पुस्तके पुरवित आहे. यावर्षी देखील बालभारतीकडून पुस्तके खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

====

दोन वर्षांपासून पालिका हद्दीतील रात्रशाळेत शिक्षणाऱ्या नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत विनामूल्य पुस्तके दिली जातात. पालिकेच्या नी. वा. किंकर रात्रशाळा, पूना नाईट स्कूल, शुक्रवार पेठ आणि आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला, सोमवार पेठ या तीन शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत. रात्रशाळेतील मराठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ३ हजार ६३२ पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत.

===

माध्यम पुस्तकांची संख्या

मराठी ४७ हजार ७८७

उर्दू १२ हजार २४२

इंग्रजी ३४ हजार ५२५

एकूण ९४ हजार ५५४