शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्याचे पैसे वाचवून विद्यार्थ्यांनी जमविली पुस्तके

By admin | Updated: November 14, 2016 02:15 IST

भोरवाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन समृद्धी उपक्रमांतर्गत एक अभिनव उपक्रम राबविला

जेजुरी : भोरवाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन समृद्धी उपक्रमांतर्गत एक अभिनव उपक्रम राबविला आहे.विद्यार्थ्यांनी दिवाळी सणात फटाके न वाचविता वाचलेल्या पैशातून पुस्तके खरेदी करून शाळेत जमा केली. जमा झालेल्या पुस्तकातून शाळेत बालवाचनालय सुरु करण्यात आले. भोरवाडी येथील प्राथमिक शाळेत गुणवत्तावाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. कात्रणचित्राचे वाचनालय, पर्यावरणावर आधारित नाटकांचे आयोजन, सण-समारंभाचे आयोजन, हस्तलिखित निर्मिती आदी उपक्रम शाळेत राबविले जात असल्याचे मुख्याध्यापक विलास बोरावके यांनी सांगितले. यंदाच्या दिवाळीत फटाके न वाजविता शाळेसाठी पाच पुस्तके भेट म्हणून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शाळा भरल्यानंतर पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्वच मुलांनी गोष्टीची व इतर अशी सुमारे दोनशे पुस्तके जमा केली. शिक्षकांच्याकडे ही पुस्तके सुपूर्त केली. त्यामध्ये गोष्टीची पुस्तके, संस्कारगीते, संतांची चरित्रे, म्हणींच्या गोष्टी, माहितीची पुस्तके यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक विलास बोरावके व शिक्षिका सोनाली गिरमे यांनी या पुस्तकांचा संग्रह करून व त्यामध्ये इतर काही पुस्तके मिसळून बालवाचनालय सुरु केले आहे.विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बालवाचनालयामुळे वाचन समृद्धी उपक्रम यशस्वीपणे राबविता येणार असल्याचे उपशिक्षिका सोनाली गिरमे यांनी सांगितले.