शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांचे गाव आता एका क्लिकवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 07:01 IST

वाचनसंस्कृती जपणारी संस्कारक्षम पिढी तयार व्हावी, यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने महाबळेश्वरजवळील भिलार येथे देशातील पहिलेवहिले पुस्तकांचे गाव साकारले

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : वाचनसंस्कृती जपणारी संस्कारक्षम पिढी तयार व्हावी, यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने महाबळेश्वरजवळील भिलार येथे देशातील पहिलेवहिले पुस्तकांचे गाव साकारले. मात्र, भिलार अद्याप इंटरनेटच्या जगात अवतरलेले नव्हते. वर्षपूर्तीनिमित्त हे पुस्तकांचे गाव आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. भिलारची इत्थंभूत माहिती देणारे संकेतस्थळ लवकरच पर्यटक, वाचकांच्या भेटीला येत आहे. संकेतस्थळाचा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असून त्या माध्यमातून पुस्तकांच्या गावाला पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. वर्षपूर्तीचे औैचित्य साधून प्रकल्पामध्ये आणखी पाच घरांचा समावेश करण्यात आला असून, अ‍ॅम्फी थिएटरचे लोकार्पण होणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह गुजराथी पुस्तकेही समाविष्ट केली जाणार आहेत.भिलारच्या संकेतस्थळाचे काम तीन-साडेतीन महिन्यांपासून सुरू होते. यासाठी सुमारे ७०-७५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. वर्षपूर्तीनिमित्त २५ घरांमध्ये आणखी ५ घरांची भर घालण्यात आली आहे. पुस्तकांच्या गावी वाचनाबरोबरच साहित्यातील विविध प्रकारांची ओळख व्हावी, यादृष्टीने अभिवाचन, नाट्य सादरीकरण अशा विविध साहित्यविषयक कार्यक्रमांसाठी साकारलेल्या मुक्त मंचाचे अनावरणही होणार असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक आनंद काटीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.एक हजार पुस्तके उपलब्ध करुन देणारपुस्तकांच्या गावात मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह गुजराथी साहित्य उपलब्ध होणार आहे. यासाठी बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून गुजरातमधील साहित्यिकांशी बोलणी सुरू असून, सुमारे १,००० गुजराथी पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.