शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनकारांच्या तारखा झाल्या ‘बुक’

By admin | Updated: June 21, 2015 00:47 IST

सध्या अधिक मास सुरू असून, या दिवसांत हरिनाम सप्ताह आयोजित करण्याची प्रथा आहे. सप्ताहातील दिवसभराच्या कार्यक्रमात कीर्तनाला विशेष महत्त्व असल्याने अनेक

मंगेश पांडे , पिंपरी सध्या अधिक मास सुरू असून, या दिवसांत हरिनाम सप्ताह आयोजित करण्याची प्रथा आहे. सप्ताहातील दिवसभराच्या कार्यक्रमात कीर्तनाला विशेष महत्त्व असल्याने अनेक कीर्तनकारांच्या महिन्याभराच्या तारखा अगोदरच बुक झाल्या आहेत. अधिक मास हा महिना धार्मिक कार्यक्रमांसाठी शुभ मानला जातो. या महिन्यात ठिकठिकाणी अन्नदान आणि हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. सप्ताहामध्ये कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन घेतले जाते. या दिवसभराच्या कार्यक्रमात विशेषत: कीर्तनासाठी नागरिकांची अधिक गर्दी असते. याच कीर्तनकारांचे सध्या दिवसाचे ‘शेड्यूल्ड पॅक’ आहे. कीर्तनकारांना मानधन दिले जाते. जास्तीत जास्त मानधन देणारे आयोजकदेखील आहेत. ग्रामीण भागातील गावांमध्ये नेहमीचे कीर्तनकार ठरलेले असतात. त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना सांगितले जात नाही. तिथीदेखील या कीर्तनकारांना माहिती असतात. गावकऱ्यांकडूनही संबंधित कीर्तनकाराचा योग्य सन्मान राखला जातो. कीर्तनकारांना साथसंगत देण्यासाठी पखवाजवादक, वीणेकरी, टाळकरी, गायक यांचीही आवश्यकता असते. या सर्वांचा एक संचच असतो. सध्या हे संचदेखील उपलब्ध होत नाहीत. बहुतेक संच वारकरी शिक्षण संस्थेतील असतात. सप्ताहाचे सात दिवस त्यांना ठरवून दिलेले असतात. मात्र, सध्या वारकरी शिक्षण संस्थेतही संच मिळत नसल्याने आयोजकांना पळापळ करावी लागत आहे. ज्ञानेश्वरी, गाथा यांसह विविध ग्रंथांचा अभ्यास करून ज्ञान आत्मसात केले जाते. यामागे वर्षानुवर्षांची मेहनत असते. यातून मिळणाऱ्या ज्ञानातून कीर्तनकार घडतो. हेच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून संपर्क वाढविला आहे.कीर्तनाचे धडेवारकरी प्रशिक्षण संस्थेत कीर्तनाचे धडे दिले जातात. प्रशिक्षणार्थी कीर्तनकारदेखील काही ठिकाणी कीर्तन करताना दिसतात. अनेक बालकांना याबाबत आवड निर्माण होऊ लागली आहे. देहू, आळंदीसह पुणे व परिसरात सुमारे दहा हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. कीर्तन प्रशिक्षणासाठी विविध संस्थांमार्फतही वर्ग घेतले जात आहेत. त्याचा फायदा अनेक जण घेत आहेत. कीर्तनकारांमध्ये तरुण कीर्तनकारांचीही संख्या वाढली आहे. तसेच श्रोत्यांमध्येही तरुण चेहरे वाढले आहेत.