पुणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नारायण पेठेतील कार्यालयात आलेल्या कुरिअर पार्सलमध्ये संशयास्पद वस्तू, डिटोनेटर, बॅटरी अशा बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने गुरुवारी खळबळ माजली. माकर््सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांनी पोलिसांना माहिती देताच बॉम्ब शोधक पथक पार्सल घेऊन गेले. त्याचा अहवाल आलेला नाही. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना अजित अभ्यंकर म्हणाले, हे पार्सल कार्यालयात बुधवारीच आले मात्र त्याच्यावर माझे नाव असल्यामुळे कुणीच त्याला हात लावला नाही. गुरुवारी हे पार्सल मी उघडले तर त्यात पावडर, डिटोनेटर, बॅटरी अशा बॉम्बशी निगडित वस्तू सापडल्या आणि धमकीचे पत्र होते. परंतु ते पत्र वाचता आले नाही. पोलिसांना कळविल्यावर त्यांनी बॉम्बशोधक पथकाला बोलावले आणि ते पार्सल घेऊन गेले. ते पत्र वाचले असते तर यामागे नक्की कुणाचा हात आहे ते कळले असते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बॉम्बसदृश पार्सल
By admin | Updated: April 28, 2017 06:07 IST