शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगावमध्ये बोगस उतारे

By admin | Updated: November 3, 2014 05:07 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील काही गावांमध्ये सातबारा, आठ ‘अ’ व उत्पन्नाच्या दाखल्यांवर बोगस सही-शिक्के मारून कागदपत्रे बनविण्याचे प्रकार घडत आहेत.

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील काही गावांमध्ये सातबारा, आठ ‘अ’ व उत्पन्नाच्या दाखल्यांवर बोगस सही-शिक्के मारून कागदपत्रे बनविण्याचे प्रकार घडत आहेत. तहसील कचेरीत उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आलेल्या कागदपत्रांमधून ही गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणांची चौकशी करून आरोपींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे तहसीलदार बी. जी. गोरे यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील लोकांसाठी शासनाच्या शेती, वैयक्तिक लाभाच्या अशा अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सातबारा, आठ अ, उत्पन्नाचे दाखले सतत लागत असतात. हे दाखले मिळविण्यासाठी सर्कल, तलाठी, कोतवाल यांच्याकडे जायला लागू नये, यासाठी काही लोकांनी तलाठ्याचे शिक्के बनवून घेतले आहेत. जुन्या उताऱ्यांची झेरॉक्स काढून त्यावर घरच्या घरीच सही-शिक्के मारून अथवा गावात एखाद्याकडून सही-शिक्के मारून घेऊन सातबारा, आठ अ, तलाठ्याचे उत्पन्नाचे दाखले सर्रास वापरले जात आहेत. असे प्रकार घडत असल्याचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कचेरीत येणाऱ्या प्रकरणांची चौकशी केली. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कचेरीत आलेल्या पंचाळे बुद्रुक येथील दत्तात्रय भोरू तारडे व आसाणे येथील नामदेव बुधा शेळकंदे यांच्या प्रकरणाला बोगस सही व शिक्के मारलेला सातबारा, आठ अ व तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला असल्याचे आढळून आले. हे उतारे स्वत: अर्जदाराने बनविले की कोणाकडून बनवून घेतले, याचा खुलासा अर्जदाराकडून तहसीलदार यांनी मागितला असून, याबाबत खुलासा प्राप्त होताच दोषींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे तहसीलदार बी. जी. गोरे यांनी सांगितले. (वार्ताहर)