शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांचा फास आवळला

By admin | Updated: February 9, 2015 04:08 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ८ हजार अधिकृत डॉक्टरांचा डेटाबेस तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ८ हजार अधिकृत डॉक्टरांचा डेटाबेस तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे नॅचरोपॅथी, इलेक्ट्रोहोमियोपॅथीच्या फसव्या पदव्या लावून रुग्णांची फसवणूक करणारे बोगस डॉक्टर आपोआप कचाट्यात सापडणार असून, त्यांच्याविरुद्धचा फास आवळला जाणार आहे.राज्य शासनाने १९९१ मध्ये बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकांमध्ये आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र, २०१२ पर्यंत त्यावर काहीच अंमलबजावणी झाली नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सन २०११-१२ मध्ये शहरातील बोगस डॉक्टरांमुळे होणारे गंभीर परिणाम उजेडात आणले. तसेच या प्रकाराबद्दल मोहीम उघडली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.पुणे महापालिकेमध्ये २७ सप्टेंबर २०१३ रोजी बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची स्थापना होऊन कारवाई करण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्या वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे शहरातील अधिकृत डॉक्टरांची यादीच नसल्याचे उजेडात आले. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयामार्फत सर्व डॉक्टरांना अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. या अर्जासोबत आवश्यक त्या वैद्यकीय पदव्यांची प्रमाणपत्रे जोडून जमा करून घेतला जात आहे. शहरातील ८ हजार वैद्यकीय व्यावसायिकांना याचे वाटप करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी २०१५ ही अर्ज जमा करण्याची शेवटची मुदत आहे. या कारवाईमुळे शहरामधील बोगस डॉक्टरांना पायबंद बसणार आहे. (प्रतिनिधी)