शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांसाठीच्या योजनांची बोगस प्रकरणे

By admin | Updated: November 18, 2016 06:12 IST

वेल्हे तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या योजनांवर काही ठराविक लोकांनीच बोगस कागदपत्रांच्या आधारे डल्ला मारला असून

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या योजनांवर काही ठराविक लोकांनीच बोगस कागदपत्रांच्या आधारे डल्ला मारला असून, पंचायत समितीच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनीदेखील याकडे सोयीस्कर काणाडोळा केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. तालुक्याचे गटविकास अधिकारी यांनीदेखील अशाप्रकारे गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. वेल्हे पंचायत समितीमधील समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये सन २०१५-१६ या वर्षात हा भ्रष्टाचार झाला असून, अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस प्रकरणे करण्यात आली आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोरेकर यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीमध्ये हा गैरप्रकार उघड झाला आहे.मागसवर्गीयांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शंभरटक्के अनुदानावर पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक साहित्यांचे वाटप केले. या योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांना अनेक कागदपत्रांबरोबर उत्पन्नाचे दाखले, ग्रामसभेचा ठराव, तसेच १०० रुपयांच्या मुद्रांकावर हमीपत्र देणे गरजेचे असते. वेल्हे पंचायत समितीमधील समाजकल्याण विभागामार्फत या लाभाच्या योजनांसाठी अनेक प्रकरणात मुख्य कागदपत्रांना फाटा देऊन प्रकरणे करण्यात आली आहेत. शिवाय, एकाच कुटुंबातील सदस्यांना एकाच वर्षात दोनदा लाभ देण्यात आले आहेत. काही प्रकरणांवर खोट्या सह्या करण्यात आल्या असून, एका व्यक्तीच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने लाभ घेतला आहे. याबाबत माहिती देताना भोरेकर यांनी सांगितले की, याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवल्यावर राजकीय पक्षाचे पत्र दाखवून दबाव टाकून माहिती देण्यास नकार देण्यात आला होता. मात्र, मी याबाबत अपिलीय अधिकारी वेल्हेचे गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील करून माहिती मागवल्यावर सर्व प्रकरणांची माहिती देण्यात आली. यामध्ये हा भ्रष्टाचार उघड झाला आहे. याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.समाजकल्याण विभागाच्या अधिकारी एल. बी. पवार यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, वेल्हे पंचायत समितीमध्ये मागासवर्गीय लाभार्थींच्या योजनांबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच योजनांचे अर्ज स्वीकारले जातात. परंतु, पदाधिकारी यांच्या दबावामुळे प्रकरणे अपूर्ण असतानासुद्धा स्वीकारावी लागतात. (वार्ताहर)