शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुखई नदीत सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह

By admin | Updated: October 6, 2016 03:40 IST

मुखई येथील वेळनदीच्या पात्रात एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

शिक्रापूर : मुखई येथील वेळनदीच्या पात्रात एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.सिद्धेश नथू गायकवाड (वय १७, रा. खोडद, ता. जुन्नर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धेश मुखई येथील शाळेत शिकत होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार ३ आॅक्टोबर रोजी पोलिसांना मिळाली होती. यानंतर त्याचा मृतदेह मुखई येथील वेळ नदीच्या पात्रात अडकलेला आढळून आला. येथील मुख्याध्यापक शिरसाट यांनी सांगितले, की सिद्धेश मुखई येथील काळभैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अकरावी शास्त्र शाखेत शिकत होता. तो येथील पार्वतीबाई या वसतिगृहात राहत होता. सोबतच्या विद्यार्थ्यांकडून तो पोहायला गेला असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहकाऱ्यांसोबत हा मुलगा पोहण्यास गेला होता. तो पोहताना बुडाला. परंतु घाबरलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली नाही, अशी माहिती समोर येत आहे.