शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता परप्रांतीय तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

By admin | Updated: January 15, 2017 05:28 IST

चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अठरावर्षीय परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आज (दि. १४) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कालठण नं. २ गावच्या हद्दीत उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्यात आढळला.

इंदापूर : चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अठरावर्षीय परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आज (दि. १४) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कालठण नं. २ गावच्या हद्दीत उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्यात आढळला.हेदादूल अमीन शेख (वय १८, मूळ रा. अमानत दिआडा, ता. राधानगर, जि. साहेबगंज, झारखंड, सध्या रा. शिरसोडी, ता. इंदापूर) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात त्याचा चुलतभाऊ मिराजुन तालिब शेख याने दि. ११ जानेवारीस तो बेपत्ता झाल्याची खबर इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सांगितले, की खबर देणारे व त्याचे कुटुंबीय मजुरी करून उपजीविका करतात. मिराजुन शेख याचा चुलतभाऊ रफीक अमीन शेख, हेदादूल अमीन शेख मासेमारीचा व्यवसाय करण्यासाठी उजनी पाणलोटक्षेत्रातील शिरसोडी गावात येऊन राहिले होते. १० जानेवारीस १० वाजता हेदादूल बेपत्ता झाला. शोधाशोध करून दुसऱ्या दिवशी तो बेपत्ता झाल्याची खबर मिराजुन याने इंदापूर पोलिसांना दिली. आज सकाळी हेदादूलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या प्रकरणाविषयी शहर परिसरात वेगळीच चर्चा होत होती. मृत तसेच त्याचे भाऊ वाळूउपसा करणाऱ्या बोटीवर काम करीत होते. १० जानेवारीला इंदापूर महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकला. कामगारांची बेदम धुलाई केली. त्या वेळी झालेल्या मारहाणीत हेदादूलचा मृत्यू झाला व बोटीला जलसमाधी देताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली ते गाडला गेला, अशी चर्चा होती. गाडलेल्या बोटी वर काढल्या तरी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे ग्रामस्थांनी सांगितले. दबावामुळे वस्तुस्थिती समोर येत नसल्याची चर्चा होती.