शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोटी पळवल्या... वाळूही केली गायब

By admin | Updated: October 12, 2016 02:39 IST

पुणे जिल्ह्यात चोरट्या वाळूवाहतुकीचा बाजार मांडलेल्या वाळुमाफियांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. पाटस : पाटस (ता. दौंड) येथील ग्रामपंचायती

पाटस/देऊळगावराजे : पुणे जिल्ह्यात चोरट्या वाळूवाहतुकीचा बाजार मांडलेल्या वाळुमाफियांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. पाटस : पाटस (ता. दौंड) येथील ग्रामपंचायती समोरील वाळूचे ढिगारे रात्रीतून अचानकपणे गायब झाले. तर देऊळगावराजे येथे पकडलेल्या बोटीही शिताफीने त्यांनी गायब केल्या आहेत. पाटसमध्ये चौकशीचे आदेश देण्यापलीकडे प्रशासनाच्या हातात मात्र काही राहिलेले नाही. तर देऊळगावराजे येथे महसुल वनविभाच्या कर्मचारी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करीत आहे. पाटसच्या संदर्भात मंडल अधिकारी, तलाठी यांना चौकशीच्या सूचना दिल्या असून, वाळू गायब प्रकरणात ज्या कोणाचा हात असले त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी पाटस ग्रामपंचायती समोर वाळूचे ढिगारे साचले होते. हे वाळूचे ढिगारे कोणी जमा केले, याचा थांग पत्ता नाही; मात्र मध्यरात्रीच्या सुमाराला हे ढिगारे गायब झाले आहे. एकंदरीतच ढिगारे गायब केले कोणी, याबाबत ग्रामस्थांत चर्चा सुरू आहे. पाटस ग्रामपंचायत हद्दीतून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घातल्याचा ठराव झाला आहे. कारण, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या आवजड वाहनांमुळे रस्ते खराब होण्याचे प्रकार सुरू झाले असल्याने ग्रामसभेत वाळू वाहतुकीच्या बंदीचा ठराव झाल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. पेडगाव येथे वन विभागाच्या हद्दीतील यांत्रिक बोटीवर दौंडचे तहसीलदार विवेक साळुंके यांनी कारवाई केली. त्यांच्या पथकांनी या बोटींना जलसमाधीही दिली. याच दिवशी पेडगाव साखरी पुनर्वसन येथेही या पथकाने बोटी पकडल्या. त्यानंतर पंचनामे करून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटी कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात दिल्या. मात्र, बोटीच्या बंदोबस्तासाठी अधिकारी नसल्याचा फायदा घेत वाळूमाफियांनी या बोटीने के्रनच्या साह्याने ट्रकमध्ये टाकून पळवल्या. पेडगाव (ता. दौंड) येथे बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीवर दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे सार्वजनिक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आम्ही बोटी ताब्यात घेतल्या नसल्याचे सांगतात. परंतु, तहसीलदार यांनी पंचनामा तयार करून त्यावर ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेऊनच वनविभागाच्या ताब्यात दिल्या आहेत.