शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ १४ मार्चला संपुष्टात

By admin | Updated: April 22, 2017 03:42 IST

महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मुदतीवरून झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे, महापालिकेच्या शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्च २०१७ रोजीच संपुष्टात आल्याचे स्पष्टीकरण

पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मुदतीवरून झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे, महापालिकेच्या शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्च २०१७ रोजीच संपुष्टात आल्याचे स्पष्टीकरण महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आज मुख्यसभेत दिले. मुदत समाप्तीनंतर शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जगताप यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या मुख्यसभेत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाची सद्यस्थिती काय आहे याची विचारणा प्रशासनाकडे केली. तसेच शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमांसाठी अंदाजपत्रकामध्ये १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद असताना शिक्षण मंडळाकडून १ कोटी ४७ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली होती. यासाठी आयुक्तांची परवानगी घेतली होती का याची विचारणा त्यांनी केली. राजेंद्र जगताप यांनी सांगितले, ‘‘उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाची मुदत संपेपर्यंत ते अस्तित्त्वात राहिल असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिक्षण मंडळाचा कारभार पालिकेकडे घेण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्च २०१७ ला संपुष्टात आली आहे. त्यामुळे शिक्षण मंडळ बरखास्त होणार आहे.’’ शिक्षण मंडळाकडून मागील दिवसांत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आणि निर्णयांचा अहवाल मागविण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने कार्यक्रमांचे अतिरिक्त बिल देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाची परवानगी घेतलीनव्हती. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)- महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे शिक्षण मंडळाच्या मुदतीबाबत विचारणा करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी जुलै महिन्यात शिक्षण मंडळाची मुदत संपेल असे स्पष्टीकरण दिले होते. यापार्श्वभुमीवर विधी विभागाचा सल्ला घेतल्यानंतर शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्चला संपल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.