शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक शुल्क बुडवणाऱ्या टोलनाक्यांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:10 IST

सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील टोल कंपन्यांमार्फत खासगी कंपन्या, सरकारसोबत अनेक करार केले जातात. या सर्व ...

सुषमा नेहरकर-शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील टोल कंपन्यांमार्फत खासगी कंपन्या, सरकारसोबत अनेक करार केले जातात. या सर्व करारांवर कायद्यानुसार ०.२ टक्के रक्कम मुद्रांक शुल्क म्हणून शासनाला जमा करणे बंधनकारक आहे. परंतु राज्यातील बहुतेक सर्व टोल कंपन्या हा कायदा धाब्यावर बसवत मुद्रांक शुल्क भरले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांनी संबंधित टोल कंपन्यांना मुद्रांक शुल्क वसुलीचे आदेश दिले आहेत. या टोल कंपन्यांनी तब्बल २०२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क तातडीने भरावे, अशा नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

कोरोना व लाॅकडाऊनमुळे राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने आतापर्यंत दुर्लक्षित सर्व घटक कराच्या कक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. याचच एक भाग म्हणून आता टोल कंपन्यांकडून सरकार व अन्य खाजगी संस्थांसोबत केल्या जाणाऱ्या सर्व करारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बहुतेक टोल कंपन्यांकडून मुद्रांक शुल्क भरणा जाणीवपूर्वक टाळला जात असल्याचे आढळून आले. याची सर्व माहिती नोंदणी महानिरीक्षकांनी काढली असून संबंधितांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

“राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क कायद्यानुसार सर्व प्रकारच्या करारांवर मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक आहे. परंतु अनेकांकडून हे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. आता राज्यातील सर्व टोल नाके व संबंधित कंपन्यांना कायदेशीर नोटिसा काढण्यात आल्या आहेत. सरकार अथवा खाजगी कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींसोबत झालेल्या सर्व प्रकारच्या करारावर स्टॅम्प ड्युटी कायद्यानुसार ०.२ टक्के मुद्रांक शुल्क जमा करण्याचे आदेश दिले आहेत.”

- ज्ञानेश्वर खिलारी, सह नोंदणी महानिरीक्षक